सोशल मीडियावरून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा इशारा

सोशल मीडियावरून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा इशारा

Ahmednagar News : सोशल मीडियावरून दोन जाती-धर्मात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून, सीआरपीसी कलम १४९ नुसार सर्व सोशल मीडियावरील ग्रुपला नोटीस जारी करण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या कोणत्याही सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.

क्रेडिट कार्डच्या सुरक्षेसाठी ‘या’ टिप्स अत्यंत महत्त्वाच्या, जाणून घ्या

सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम काही समाजकंटकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत आहे. सोशल मीडियात अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल होत असल्याच्या काही घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. शहरात सामाजिक शांतता रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जात असून, दोन जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत.

BEd vs BTC : ‘बीएड’धारकांना मोठा धक्का, फक्त BTC पदवीधरांना शिक्षक होता येणार

त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर येत असलेले मेसेज, फोटो आणि मजकूर यावर कोणताही विश्वास ठेऊ नये, तसेच आलेले मेसेज समोर फॉरवर्ड करू नये. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने कोणी आक्षेपार्ह मेसेज केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.

चांद्रयान 3 ने पाठवला पहिला Video; ‘ऑर्बिट रिडक्शन’ प्रक्रिया यशस्वी

व्हाट्सअप ग्रुपला ओन्ली ॲडमिन अशी सेटिंग करावी, जेणेकरून कोणत्याही अफवा असणारे मेसेज फॉरवर्ड होणार नाहीत. कोणत्याही ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास ग्रुप ॲडमिनसह सर्व सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कोतवाली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कायदा हातात घेऊन कोणीही गैरप्रकार करू नये. कोणतेही चुकीचे संदेश फॉरवर्ड करू नयेत. आक्षेपार्ह मजकूर किंवा कमेंट करू नये. तणाव निर्माण करणारे मेसेज व्हायरल केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube