अहिल्यानगरमध्ये रविवारी जिल्हास्तरीय मीडिया संमेलन; प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाचा उपक्रम

  • Written By: Published:
अहिल्यानगरमध्ये रविवारी जिल्हास्तरीय मीडिया संमेलन;  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाचा उपक्रम

माऊंट आबू येथील राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठानच्या मीडिया प्रभाग आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय, अहिल्यानगर शाखेच्या वतीने पत्रकारिता व माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांसाठी रविवारी (20 जुलै) सकाळी 10 ते 12 या वेळेत जिल्हास्तरीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी राजेश्‍वरी दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली बी के सुप्रभा दीदी, बी के डॅा दीपक हरके यांच्यासह अहिल्यानगर सेवाकेंद्राचे सर्व बी के सदस्य प्रयत्नशील आहेत.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय शिवदर्शन भवन, महावीर नगर, शेवडी रोड, अहिल्यानगर-414001 येथे हे संमेलन होणार आहे.
समाजाचे दर्पण म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारिते मध्ये अनेक बदल होत आहे, अनेक प्रवाह आणि नवीन आयाम पत्रकारितेमध्ये आणि माध्यमांमध्ये आले आहेत. पेन पत्रकारितेपासून पेनलेस पत्रकारितेपर्यंत पोहचलेल्या या बदलत्या प्रवाहात पत्रकारितेतील शाश्‍वत मूल्य कुठे तरी लोप पावत असल्याची जाणीव होत आहे. या मूल्यांना पुनर्स्थापित करण्याची गरज निर्माण झालेली आहे. यासाठी पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पूर्नस्थापना आणि पेन ते पेनलेस (डिजिटल) पत्रकारितेचा प्रवास या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. (Sunday district level media conference in Ahilyanagar; Prajapita Brahma Kumari Ishwari Vishwavidyalaya)

या संमेलनासाठी ब्रह्माकुमार डॉ. शांतनू भाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंटआबू (राजस्थान) आणि प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे, जळगाव, मीडिया प्राध्यापक व महाराष्ट्र राज्य मीडिया प्रभाग समन्वयक, मार्गदर्शन करणार.

संमेलनासाठी वृत्तपत्रे आणि प्रिंट मीडिया, टि.व्ही,, रेडिओ, केबल, आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाईल जर्नालिझम, सायबर/सोशल मीडिया, तसेच पत्रकारिता आणि मीडिया शिक्षण देणा-या संस्था, जनसंपर्क, जाहिरात आदि क्षेत्रातील मीडिया प्रतिनिधी, संपादक यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सहभागासाठी कुठलेही नोंदणी शुल्क नाही, तथापि, नोंदणी आवश्‍यक आहे. नोंदणी क्यूआर कोड अथवा: https://tinyurl.com/BkMahaMedia या लिंकद्वारे होऊ शकतें. उपरोक्त दोन्हीला पर्याय म्हणून 9850693705 या व्हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधू शकतात. संमेलनासंदर्भात अधिक माहितीसाठी
https://bkmahamedia.com/ahilyanagar/ या वेबसाईट ला भेट द्यावी.

संमेलनानंतर सर्व पत्रकार बांधवांसाठी ब्रह्माभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या संमेलनात पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका ब्रह्माकुमारी राजेश्‍वरी दिदी यांनी केले आहे.

या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी राजेश्‍वरी दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली बी के सुप्रभा दीदी, बी के डॅा दीपक हरके यांच्यासह अहिल्यानगर सेवाकेंद्राचे सर्व बी के सदस्य प्रयत्नशील आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क करावा
ब्रह्माकुमारी राजेश्‍वरी दिदी,
संचालिका, अहिल्यानगर सेवा केंद्र
संपर्क : 7276430213

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या