अखेर तीन दिवसांनंतर शेवगावमधील बेमुदत बंद मागे

Untitled Design   2023 05 18T173940.740

Shevgaon Riots : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत दगडफेक झाली. त्यातून शहरात दंगल झाली. या घटनेचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांसह नागरिकांनी शेवगाव बेमुदत बंदची हाक दिली होती. मात्र आज अखेर तीन दिवस सुरु असलेला हा बेमुदत संप आज मागे घेण्यात आला आहे.

शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान ही मिरवणूक शहरातील मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली होती. त्याचवेळी एका गटाकडून मिरवणुकीवर जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यामुळे काही क्षणात परिस्थिती चिघळली. त्यांनतर दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक करण्यात आल्याचे समोर आले. एक गटातील काही तरुणांकडून गाड्यांची तोडफोड केली. तसेच दुकानाचे देखील मोठे नुकसान झाले.

त्यांनतर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व्यापारी मंडळी व शहरातील नागरिकांकडून बेमुदत संप पुकारण्यात आला. याप्रकरणातील दोषींना अटक होऊन त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली. दरम्यान पोलिसांकडून तातडीने पाऊले उचलत अनेकांना ताब्यात घेण्यात आले. तसेच 150 हून अधिक जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. तसेच तीन दिवस सुरु असलेल्या बेमुदत बंद अखेर आज मागे घेण्यात आला आहे.

Tags

follow us