पालघर, नाशिक, बुलढाण्यात अवकाळी पाऊस बरसला, शेतकरी चिंतेत

पालघर, नाशिक, बुलढाण्यात अवकाळी पाऊस बरसला, शेतकरी चिंतेत

नाशिक : पालघर (Palghar), नाशिक (Nashik) आणि बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण आहे.

नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष यांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने शेककऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचं देखील समोर आलं आहे.

दुसरीकडे पालघर जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. वाडा, विक्रमगड, जव्हार आणि पालघरच्या काही भागात विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे शेतकरी आणि वीट भट्टी व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. आंबा त्याचप्रमाणे इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

बुलढाणा जिल्ह्यात रात्री जवळपास सर्वच तालुक्यात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा आणि कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा चिंतातूर झालेला आहे.

जय शाह यांचा फोन आल्यानंतर Uddhav Thackeray काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये रात्री पावसाच्या सरी बरसल्या. शहरातील काही भागात देखील रात्री तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळाली.

दरम्यान महाराष्ट्रात तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube