तमाशा कलावंत शांताबाईंच्या मदतीला महिला आयोग, चाकणकरांनी दिले आदेश

तमाशा कलावंत शांताबाईंच्या मदतीला महिला आयोग, चाकणकरांनी दिले आदेश

Rupali Chakankar On Tamasha Kalawant Shantabai : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांचा बस स्टँडवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राज्य सरकारने कलावंतांना मदत करायला हवी अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली. आता शांताबाई कोपरगावकर यांची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच शांताबाई यांना मदत करण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाला सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर या ज्येष्ठ मराठी कलाकारावर उतारवयात दयनीय अवस्थेत राहण्याची वेळ आली आहे, अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या आहेत. आयोगाच्या वतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांना संपर्क करण्यात आला आहे. सध्या शांताबाई नगरच्या एका रुग्णालयात आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांची महिला बाल विकास विभागामार्फत वृद्धाश्रमात व्यवस्था करावी असे जिल्हा महिला बालविकास अहमदनगर यांना सांगण्यात आले आहे.

चर्चा तर होणारच! थोरातांचे भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागले, विखेंनी दिल्या खोचक शुभेच्छा

त्यांनी पुढं म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने कलाकारांच्या निवृत्ती वयात त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. शांताबाईंना राज्य शासनाच्या योजनांमधून सन्मान जनक मानधन मिळावं, निवृत्ती वेतन मिळावं यासाठी आयुक्त, महिला बाल विकास यांना पत्र लिहून शांताबाईंना मदत मिळवून देण्यासाठीचे निर्देश आयोग देत आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

एकेकाळी लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगांवकर यांनी आपल्या अदाकारीने थिएटर गाजवलं होतं. मात्र आता लावणी सम्राज्ञी रस्त्यावर भीक मागतीय. बस स्थानकावरच तिचं घर होतं. अत्यंत बिकट अवस्थेत ती जगत होती. कोपरगावच्या बस स्टँडवरील शांताबाईचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता.

पंजाब डख यांचा अंदाज खरा ठरला, राज्यात पावसाला सुरुवात…

शांताबाई यांची तमाशा मालकाकडून फसवणूक झाली होती. मालकाने सर्व तमाशा विकून टाकला आणि शांताबाई उद्धवस्त झाल्या होत्या. त्यांना मानसिक आजाराने ग्रासलं होतं. त्या अवस्थेत त्या भीक मागू लागल्या होत्या. आता महिला आयोगाने त्यांची दखल घेत मदतीच्या सूचना दिल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube