तुम्ही ल्या थोडं मनवर; शेतकऱ्याचं सरकारला साकडं

तुम्ही ल्या थोडं मनवर; शेतकऱ्याचं सरकारला साकडं

जळगाव : राज्यात (Maharashtra)काही दिवसांपासून संपूर्ण अवकाळी पाऊस (Avakali Paus), वादळ, वारा (Storm, wind) आणि गारपीट सुरु आहे. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं (Farmer)मोठ्या प्रमाणावर शेती (Agri)पिकाचं (Crop) नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचं दुःख सरकारपर्यंत (Maharashtra Government)पोहचवण्याचा प्रयत्न एका सुशिक्षित शेतकऱ्यानं आपल्या अहिराणी गीतातून (Ahirani Geet) केला आहे.

जळगाव जिल्ह्याच्या (Jalgaon) चोपडा तालुक्यात झालेल्या वादळामुळं स्वतःचं आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान झालंय. हे पाहून शेतकऱ्यांचं दुःख किती मोठं असतं? त्याची दखल कोणीही घेत नाही, हे आपण पाहतो. शेतकऱ्यांच्या दुःखाचं वास्तव शासनापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यानं केलाय.

आता आंब्यांची खरी चव चाखायला मिळणार! FSSAI कडून नवीन आदेश जारी

चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या खर्डी गावातील सुशिक्षित शेतकरी प्रकाश क्षीरसागर यांनी (Prakash Kshirsagar) आपल्या स्थानिक अहिराणी बोली भाषेत शेतकऱ्यांच्या दुःखावर शब्दरचना मांडून गीत तयार केलं आहे.

त्या गीताच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या व्यथा शासनाला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत वारंवार नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्याच्या शेतीमालाला मिळत नसलेला भाव, यामध्ये किती वेळा मरावं अशी भावना या सुशिक्षित शेतकऱ्यानं आपल्या अहिराणी भाषेमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या शेतकऱ्यानं आपल्या गीतात म्हटलंय की,
तुम्ही ऐका ना सरकार, तुम्ही ल्या थोडं मनवर
तुम्ही ऐका ना सरकार, तुम्ही ल्या थोडं मनवर
मी शेतकरी काय करू, मी कितला सावा मरू
मी शेतकरी काय करू, मी कितला सावा मरू
ना कांदा ना कपाशी, ना सोयाबीन ले भाव
ना कांदा ना कपाशी, ना सोयाबीन ले भाव
ना शेतकरी ले आता, कोणताच मालले भाव
तुम्ही ऐका ना सरकार, तुम्ही ल्या थोडं मनवर

या गीताच्या माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे पारंपारिक शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी, खतांचे व बियाण्याचे दर वाढ झाली आहे. त्यामानानं उत्पन्नाला भाव राहात नाही. यावेळी नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर येते, त्यावर तातडीनं काहीतरी मार्ग काढून शेतकऱ्यांना न्याय देता येईल, अशी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, असं मत प्रकाश क्षीरसागर यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube