Onion Price : भाव वाढले की निर्यात बंदी करणाऱ्यांना डोळ्यातील पाणी दिसत नाही का?

  • Written By: Published:
Onion Price : भाव वाढले की निर्यात बंदी करणाऱ्यांना डोळ्यातील पाणी दिसत नाही का?

“कांद्याचे भाव वाढायला लागले की लगेच निर्यात बंदी करणाऱ्या किंवा पाकिस्तानातून कांदा आयात करणाऱ्या सरकारला आज कांद्याचे भाव कोसळल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी दिसत नाही का? ” असा प्रश्न आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विचारला आहे.

रोहित पवार यांनी आज एक ट्विट करून हा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहले आहे की, “
कांद्याचा बाजारभाव (Onion Price) ६०० ते ८०० रुपयांपर्यंत खाली घसरल्याने शेतकऱ्यांना आज मातीमोल भावात कांदा विकावा लागतोय. एकरी ६० ते ७० हजार ₹ खर्च होत असताना उत्पन्न केवळ ३० ते ४० हजार रु मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
कांद्याचे भाव वाढायला लागले की लगेच निर्यात बंदी करणाऱ्या किंवा पाकिस्तानातून कांदा आयात करणाऱ्या सरकारला आज कांद्याचे भाव कोसळल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी दिसत नाही का?

नाशिक मध्ये आंदोलन

गेल्या महिन्यभरापासून शेतकऱ्यांच्या कांदा पिकास अत्यंत तुटपुंजा भाव मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्चसुद्धा शेतकऱ्यांचा निघत नाही. अशी परिस्थिती असतानाही राज्य व केंद्र सरकार मात्र याकडे दुलर्क्ष करत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क भरमसाट वाढले आहे. याचाही परिणाम कांदा दरावर होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकास तीन हजार रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी करत आंदोलकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube