पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं निधन…

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं निधन…

Maruti Chittampalli : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली (Maruti Chittampalli) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पोलीस ऑपरेशन भ्रष्टाचार राबवतायत…गोहत्यावरून मिलिंद एकबोटेंची प्रशासनावर सडकून टीका

30 एप्रिल 2025 रोजी चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीवरुन परतल्यापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अनेक दिवस ते आजारी आणि अंथरुणातच होते. अखेर आज संध्याकाळी त्यांचं सोलापुरातील राहत्या घरी निधन झालंय.

FASTag Pass : 15 ऑगस्टपासून FASTag चा वार्षिक पास; गडकरींची मोठी घोषणा; किती पैसे लागणार?

मारुती चित्तमपल्ली यांनी वन विभागात 36 वर्षे सेवा केली. याच काळात देशभरात संशोधकवृत्तीने भटकंती केली. त्यांनी एकूण 5 लाख किमी प्रवास केला असून त्यांना 13 भाषांचे ज्ञान अवगत होते. त्यांनी आदिवासींसह इतर जमातींसोबत संवाद साधत पर्यावरणासंदर्भातील मोठी माहिती मिळवली. या माहितीची नोंद केलेल्या आणि 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षीकोश, प्राणीकोश, आणि मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या