पोलीस भरतीतील तरुणींसाठी मोठा दिलासा, तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ; जाणून घ्या कारण
Police Recruitment : पोलीस भरती करणाऱ्या तरुणींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत दिलासा दिला आहे. शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी
Police Recruitment : पोलीस भरती करणाऱ्या तरुणींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत दिलासा दिला आहे. शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आली तर तरुणींना आरोग्य तपासणीनंतर पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.
पोलीस भरतीसाठी तरुणी महिनोन्महिने शारीरिक चाचणीची तयारी करत असते मात्र ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्याने अनेक तरुणींनी कंबरदुखी किंवा अशक्तपणामुळे धावता येत नाही. त्यामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरु नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मासिक पाळीच्या काळात तरुणींना तीव्र पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, अशक्तपणा जाणवत असतो अशा परिस्थितीत मैदानी चाचणीच्या दिवशी 100 मीटर, 800 मीटर धावणं, गोळा फेकण्यास आणि इतर शारीरिक चाचण्या देताना अडचणी येऊ शकतात त्यामुळे आता शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आली.
तर तरुणींना आरोग्य तपासणीनंतर पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार, आरोग्य तपासणीचे नेमके निकष काय असतील आणि मुदतवाढ मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, याबाबतची सविस्तर अधिकृत नियमावली अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे.
मासिक पाळीदरम्यान शारीरिक चाचणीवर होणारे परिणाम
पोटदुखी आणि कळा – मासिक पाळीदरम्यान गर्भाशयाच्या आकुंचनामुळे पोटात कळा आणि वेदना होऊ शकतात. याचा परिणाम धावण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो.
थकवा आणि अशक्तपणा – काही महिलांना या काळात थकवा, अशक्तपणा किंवा ऊर्जा कमी झाल्यासारखे जाणवते. त्यामुळे धावताना वेग आणि सातत्य राखणे आव्हानात्मक ठरू शकते.
कंबरदुखी आणि स्नायूंच्या वेदना – कंबर, मांडी किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना आणि अंगदुखी जाणवू शकते. त्यामुळे शारीरिक हालचाली करताना अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
चक्कर, डोकेदुखी आणि मळमळ – काही महिलांना मासिक पाळीदरम्यान चक्कर, डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो. यामुळे शारीरिक चाचणीदरम्यान एकाग्रतेवर परिणाम होण्याची शक्यता असते.
धावण्याच्या क्षमतेवर परिणाम – वेदना, थकवा आणि अस्वस्थतेमुळे 100 मीटर किंवा 800 मीटर धावण्याच्या चाचणीत अपेक्षित वेग आणि कामगिरी राखणे काही उमेदवारांसाठी कठीण होऊ शकते.
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या पहिल्याच संचालक मंडळ बैठकीत 1 कोटींची मदत जाहीर..
गोळाफेक आणि लांब उडीवर परिणाम – शरीरावर जोर देताना, धावत येताना किंवा उडी मारताना वेदना व अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे गोळाफेक किंवा लांब उडीसारख्या चाचण्यांमध्येही कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असते.