खातेवाटप जाहीर, भाजपने शिंदेंना दिला पुन्हा धक्का, गृहखातं मुख्यमंत्र्यांकडेच!

  • Written By: Published:
खातेवाटप जाहीर, भाजपने शिंदेंना दिला पुन्हा धक्का, गृहखातं मुख्यमंत्र्यांकडेच!

Maharashtra Portfolio Allocation : राज्याचे लक्ष लागून असलेल्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप (Maharashtra Portfolio Allocation) जाहीर करण्यात आले असून पुन्हा एकदा गृहखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून गृहखात्यावरून भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत होती. एकनाथ शिंदे भाजपकडे गृहखात्याची मागणी करत होते मात्र गृहखाते सोडण्यास भाजप तयार नसल्याने गृहखातं कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

तर आता मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले असून गृहखातं भाजपने स्वतः कडे ठेवल्याने एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांना सभापतीपद देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत होती मात्र भाजपनं हे पद देखील शिवसेनेला देण्यास नकार देत विधानपरिषदेच्या सभापतीसाठी माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांना संधी दिली. त्यामुळे गेल्या चार दिवसात भाजपने एकनाथ शिंदे यांना दोन मोठे झटके दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

काही वेळेपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या खातेवाटपाध्ये एकनाथ शिंदे यांना नगरविकास विभाग देण्यात आला आहे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अर्थ खातं पुन्हा एकदा देण्यात आला आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर प्रताप सरनाईक यांना फडणवीस सरकारमध्ये परिवहन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. परिवहन विभागासाठी भरतशेठ गोगावले यांनी मागणी केली होती मात्र त्यांच्या जागी प्रताप सरनाईक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना फक्त गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचा कारभार देण्यात आला आहे.

कुणाकडे कोणतं खातं?

कॅबिनेट मंत्री

1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

5.गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

7.गणेश नाईक – वन

8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण

9.संजय राठोड – मृदा व जलसंधारण

10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल

14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

20.अदिती तटकरे – महिला व बालविकास

21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

22.माणिकराव कोकाटे – कृषी

23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

25.संजय सावकारे – कापड

26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय

27.प्रताप सरनाईक – वाहतूक

28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

31.आकाश फुंडकर – कामगार

32.बाबासाहेब पाटील – सहकार

33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री

34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

38. योगेश कदम – गृहराज्य शहर

मास्टरमाइंड कोणीही असला तरी त्याला शोधून काढणार; अजित पवार यांचे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आश्वासन

39. पंकज भोयर – गृहनिर्माण

follow us
  • fb
  • instagram
  • youtube