खाते वाटप, आजही होऊ शकतं आणि उद्या सकाळीही होऊ शकतं; देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगून टाकले

  • Written By: Published:
खाते वाटप, आजही होऊ शकतं आणि उद्या सकाळीही होऊ शकतं; देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगून टाकले

CM Devendra Fadanvis On portfolio allocation : महायुती सरकारच्या (Mahayuti Goverment) मंत्रिमंडळ विस्तारानंतर आठवडा उलटून गेला तरी अजूनही मंत्र्यांना खाते ( portfolio allocation) वाटप झालेले नाहीत. मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हिवाळी अधिवेशन सुरू झालं. आता अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप होईल असे सांगण्यात येत होते. परंतु अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर खातेवाटप झालेले नाही. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एका वाक्यात विषय मिटविला आहे. खातेवाटप लवकरच होणार आहे. लवकर म्हणजे ते आजही होऊ शकतं आणि उद्या सकाळीही होऊ शकतं, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Sangli Accident : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

मंत्रिमंडळाच्या विस्तारात महायुतीच्या ३३ आमदारांनी कॅबिनेट तर ६ आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर या मंत्र्‍यांना कोणतं खातं मिळणार याची चर्चा सुरू झाली. परंतु, शपथविधीनंतर लगेचच हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यामुळे खातेवाटपाचा मुद्दा मागे पडला. आता या अधिवेशनानंतर खातेवाटप होईल असं सांगितलं जात आहे. याआधी कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायचं यावर पुन्हा चर्चा होईल त्यानंतर आपसी सहमतीने अंतिम निर्णय घेण्यात येईल. फडणवीस यांच्यापूर्वी गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. वरिष्ठ नेत्यांकडे पालकमंत्रिपद किंवा अन्य कोणत्याही मंत्रि‍पदाची मागणी मी केलेली नाही. नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कॅबिनेट मंत्री होणं एवढं सोपं नाही. परंतु, पाच वर्षांचा मंत्रि‍पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मला पुन्हा कॅबिनेट मंत्रि‍पदी संधी मिळाली आहे. दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपद मिळणं ही बहुधा जळगाव जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी, असे ते म्हणाले. त्यानंतर अधिवेशनानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपाबाबत स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी खातेवाटप जाहीर होऊ शकते.

\
फ्लेवर्डनुसार पॉपकॉर्नवर द्यावा लागणार टॅक्स; जाणून घ्या, जगभरातील उलाढाल


अजितदादा माझी परवानगी घेऊनच गेलेत

खाते वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत टोमणा मारला. अजितदादा पवार हे दुपारीच माझी परवानगी घेऊन बीड आणि परभणी येथे गेले आहेत. ते दोन्ही ठिकाणी पीडितांची भेट देण्यासाठी गेले आहेत. म्हणून ते पत्रकार परिषदेत उपस्थित नव्हते. त्यामुळे अजितदादा नाराज अशी बातमी कुणीही देऊ नये, असे फडणवीस म्हणाले.


हे आहेत मंत्री

चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि संजय सावकारे यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आदींनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube