फ्लेवर्डनुसार पॉपकॉर्नवर द्यावा लागणार टॅक्स; जाणून घ्या, जगभरातील उलाढाल
टिव्ही, थिएटर किंवा अगदी टाईमपास म्हणून आपल्यापैकी प्रत्येकजण पॉपकॉर्न (Popcorn) खात असतो. पण आता टाईमपास म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या याच पॉपकॉर्नवर कर भरावा लागणार आहे. GST परिषदेच्या पार पडलेल्या बैठकीत पॉपकॉर्नला तीन प्रकारच्या टॅक्स स्लॅबमध्ये आणण्यात आले आहे. त्यामुळे येथून पुढील काळात खिशाला परवडणाऱ्या पॉपकॉर्नसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. पॉपकॉर्नसारखी वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणण्याची गरज का पडली? आणि भारतासह जगभरात ही बाजारपेठ किती पसरली आहे याचाच घेतलेला हा आढावा. (GST Imposed On Popcorn Know The Market)
GST परिषदेचा सर्वसामान्यांना फटका, पॉपकॉर्ससह जुन्या कारच्या किमतीही वाढणार…
फ्लेवर्डनुसार द्यावा लागणार टॅक्स
GST परिषदेच्या पार पडलेल्या बैठकीत पॉपकॉर्नला 5 टक्के, 12 टक्के आणि 18 टक्के या तीन टॅक्स स्लॅबमध्ये विभागण्यात आले आहे. खरे तर भारतात पॉपकॉर्नची बाजारपेठ लहान नसून, अंदाजानुसार भारतात पॉपकॉर्नची बाजारपेठेतील उलाढाल सुमारे 1200 कोटी रुपयांची असून, 2030 पर्यंत ही आकडेवारी जवळपास 2600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
GST परिषदेत पॉपकॉर्नवरील कर दर त्यांच्या फ्लेव्हरनुसार निश्चित करण्यात आले आहेत. यात मसालेदार पॉपकॉर्न पॅकेजिंग नसेल तर 5 टक्के, पॅक आणि लेबल केलेल्या स्वरूपात असल्यास 12 टक्के कर आकारण्यात येणार आहे. तर, साखरयुक्त पॉपकॉर्न म्हणजेच कॅरॅमल पॉपकॉर्नसारख्या प्रकारांना साखरयुक्त मिठाई मानण्यात आले असून, यावर 18 टक्के GST लागणार आहे.
तीन दिवस सुट्टी घ्या, पण पोरं जन्माला घाला; ‘लोकसंख्या’ वाढीसाठी अजब-गजब निर्णय!
जगभरात पॉपकॉर्नची बाजारपेठ 75 हजार कोटींची
एका अहवालानुसार, 2024 ते 2023 पर्यंत पॉपकॉर्न मार्केटमध्ये 12 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जगात पॉपकॉर्नची बाजारपेठ 75 हजार कोटी रुपयांची आहे. त्यामुळे सरकारला पॉपकॉर्नपासून पैसे मिळवणे किती महत्त्वाचे झाले आहे याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
भारतातील पॉपकॉर्न मार्केट
भारतातील पॉपकॉर्नची बाजारपेठ झपाट्याने वाढत असून, गेल्या काही वर्षांत यात 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, सन 2030 पर्यंत याच्या बाजारपेठेत 12 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आकडेवारीनुसार, 2023 पर्यंत पॉपकॉर्नची बाजारपेठ 1,158 कोटी रुपयांची होती. जी सध्या सुमारे 1,200 कोटी रुपयांवर आहे. विशेष म्हणजे 2030 पर्यंत हा आकडा 2,572 कोटींचा आकडाही पार करू शकतो. 2024 ते 2030 पर्यंत देशातील पॉपकॉर्न मार्केट 12.1 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे.
क्रेडिट कार्ड युजर्सला SC चा मोठा झटका; उशीरा बिल भरणाऱ्यांना द्यावे लागणार 50 टक्के व्याज
बाजारपेठ वाढण्याची कारणं काय?
खरे तर देशात पॉपकॉर्नच्या वाढत्या खपाचे मुख्य कारण म्हणजे मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांमध्ये जाण्याचा सर्वसामान्यांचा कल हे आहे. याशिवास दुसरीकडे, घरांमध्ये पॉपकॉर्न खाण्यामध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. जर आपण आकडेवारीवर एक नजर टाकली तर, 2021 मध्ये, रेडी-टू-इट (RTE) पॉपकॉर्न हा सर्वाधिक कमाई करणारा प्रकार होता. तर मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न हा सर्वात वेगाने वाढणारं सेगमेंट होता. जर आपण याच्या विक्रीवर नजर टाकल्यास भारतातील मल्टीप्लेक्स PVR दररोज सरासरी 18,000 पॉपकॉर्न टबची विक्री केली जाते.
जागतिक बाजारपेठही लहान नाही
भारतासह जागतिक बाजारपेठेतही पॉपकॉर्नची मोठी बाजारपेठ आहे. मॉर्डर इंटेलिजन्सच्या अहवालानुसार, 2024 मध्ये पॉपकॉर्नची बाजारपेठ 8.80 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 75 हजार कोटी रुपयांची आहे. जे 2029 पर्यंत 14.89 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1.26 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. पॉपकॉर्नची सर्वात मोठी बाजारपेठ उत्तर अमेरिका आहे. तर सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आशिया पॅसिफिक आहे.