अशोक खरात प्रकरणातील 2.40 कोटींच्या व्यवहारांचा उलगडा होणार? प्रतिभा चाकणकर चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर

महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आज शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 82

Pratibha Chakankar appears at the police station for questioning : महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांमुळे सध्या तुरुंगात असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणातील तपासाला आता निर्णायक वेग मिळताना दिसत आहे. या प्रकरणात एक महत्वाची घडामोड समोर आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेत्या आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आज शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत.

समता पतसंस्थेत 132 संशयास्पद खात्यांशी संबंधित या प्रकरणात ही कारवाई अत्यंत महत्वाची मनाली जात आहे. तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, या सर्व खात्यांमध्ये भोंदू अशोक खरात नॉमिनी म्हणून नोंदवले गेले होते. विशेष म्हणजे, यापैकी चार खाती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

या खात्यांमधील व्यवहारांनी तपास यंत्रणांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चार खात्यांमधून एकूण सुमारे 2 कोटी 40 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. इतकी मोठी रक्कम या खात्यांमध्ये कशी जमा झाली, त्यामागील स्रोत काय आहेत, तसेच या व्यवहारांचा उद्देश नेमका काय होता, याचा सखोल तपास सध्या शिर्डी पोलीस करत आहेत.

आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून, त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याच्याशी त्यांचे नेमके काय संबंध आहेत, तसेच या आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांची भूमिका काय होती, याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून अनेक महत्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः, प्रतिभा चाकणकर यांच्या जबाबातून या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराचे जाळे अधिक स्पष्ट होणार का, तसेच तपासाला आणखी वेग मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us