देशाचा राजा कायम पण तणावात, भेंडवळच्या घटमांडणीतून राजकारण, अर्थव्यवस्था आणि सुरक्षेबाबत संकेत

आज पहाटे सूर्योदयावेळी सूक्ष्म निरीक्षण करून वर्षभरातील पाऊस, पीकस्थिती, अर्थकारण, राजकारण आणि देशाच्या सुरक्षेविषयी अंदाज जाहीर करण्यात आले.

  • Written By: Published:
Untitled Design 9

Predictions of Bhendwal’s decline are in front : बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पारंपरिक घटमांडणीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे ३७० वर्षांची परंपरा लाभलेल्या या घटमांडणीला आजही शेतकरी वर्गात विशेष महत्व आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काल सूर्यास्ताच्या वेळी घट मांडण्यात आला, तर आज पहाटे सूर्योदयावेळी सूक्ष्म निरीक्षण करून वर्षभरातील पाऊस, पीकस्थिती, अर्थकारण, राजकारण आणि देशाच्या सुरक्षेविषयी अंदाज जाहीर करण्यात आले. यंदाच्या घटमांडणीतील निष्कर्षानुसार देशाचे नेतृत्व स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

म्हणजेच पंतप्रधान पदावर बदल होणार नसला तरी सत्ताधाऱ्यांवर तणाव वाढलेला राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला. देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर ताण वाढेल आणि सुरक्षा परिस्थिती काहीशी कमकुवत राहू शकते, असे देखील संकेत या भाकितांतून देण्यात आले आहेत. आर्थिक आघाडीवर देशाला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असे चित्र देखील समोर आले आहे. शेतीच्या दृष्टीने पाहता, यंदा शेतकऱ्यांसाठी वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विविध पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढेल, असा अंदाज आहे.

मात्र काही पिकांसाठी परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे. कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरी या पिकांचे उत्पादन चांगले होईल आणि त्यांना बाजारात योग्य भाव देखील मिळेल, असे भाकीत करण्यात आले आहे. ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण पातळीवर राहतील, असे देखील सांगण्यात आले. पावसाच्या दृष्टीने जून महिन्यात चांगला पाऊस पडेल, जुलै महिन्यात तो सर्वसाधारण राहील, तर ऑगस्ट आणि सप्टेम्बबारमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे महापुराचा धोका निर्माण होऊन नुकसान होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत शिस्त आणण्यासाठी मोठं पाऊल; पीए आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर मर्यादा

ही घटमांडणी नेमकी कशी केली जाते, याबाबत देखील उत्सुकता असते. मातीचे ढेकूळ, विविध धान्ये, करंजी, पान-विडा, मसूर यांसारख्या नैसर्गिक घटकांच्या आधारे रात्रभर होणाऱ्या बदलांचे पहाटे निरीक्षण केले जाते. यावरून पाऊस, पीक, अर्थव्यवस्था, रोगराई, राजकीय स्थिती आणि परकीय घुसखोरी याबाबत संकेत घेतले जातात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, करंजीवरून आर्थिक स्थिती, भादलीवरून रोगराई, पान-विद्यावरून सत्तास्थिती तर मासूरवरून परकीय धिक्याचा अंदाज वर्तवला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशासह विविध भागांतून हजारो शेतकरी भेंवळ येथे दाखल झाले होते.

अनेकजण येथे मुक्काम करून हे भाकीत ऐकतात आणि त्यानुसार पुढील हंगामाचे नियोजन करतात. बी-बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी देखील शेतकऱ्यांचा कल जाणून घेण्यासाठी येथे उपस्थित राहतात. घटमांडणीला शास्त्रीय आधार नसल्याचे तज्ज्ञांचे मत असले तरी परंपरेचा वारसा आणि अनुभवाच्या आधारे या भाकितांवर शेतकऱ्यांचा आज देखील ठाम विश्वास आहे. अनेकदा ही भाकिते प्रत्यक्षात देखील खरी ठरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आधुनिक विज्ञानाच्या युगात देखील भेंडवळची ही परंपरा शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

follow us