पुण्यात प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर संगीत व नृत्य करंडकाचे आयोजन

शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर संगीत व नृत्य करंडक स्पर्धेचे आयोजन.

  • Written By: Published:
Untitled Design (91)

Principal Dr. Sudhakarrao Jadhavar organized the music and dance trophy : शालेय विद्यार्थ्यांसह सामान्यांमधील संगीत व नृत्य विषयक सुप्त गुणांना वाव देत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस आणि सृजनसभा, पुणे तर्फे प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर संगीत व नृत्य करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 19 व 20 डिसेंबर रोजी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, नऱ्हे येथे ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यस्तरीय आंतरशालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात ही स्पर्धा होणार आहे. वय वर्षे 10 ते 17 (इयत्ता 5 वी ते 12 वी) आणि वयवर्षे 18 ते 30 (महाविद्यालयीन व खुला गट) अशी स्पर्धा होईल. शुक्रवार, दि.19 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता समूहगीत स्पर्धेत देशभक्तीपर गीत हा विषय आहे. त्यानंतर छोटा ख्याल गायन स्पर्धा ही एकल प्रकारात होणार आहे.

मोठी बातमी; पुण्यासाठी 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर; महानगर क्षेत्रात होणार 220 प्रकल्पांतर्गत कामं

शनिवार, दि.20 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता समूहनृत्य स्पर्धा देशभक्तीपर गीतावर होणार आहे. तसेच त्यानंतर शास्त्रीय नृत्य/ महाराष्ट्रीय लोकनृत्य या प्रकारात स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना एकूण 1 लाख रुपयांपेक्षा अधिकची पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सहभागासाठी नोंदणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर असून 9850010297, 7875516753, 7249282683 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

follow us