मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन
Anand Nadkarni : मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन झालं असून वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी
Anand Nadkarni : मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन झालं असून वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सकाळी मुंबईतील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते मात्र शुक्रवारी सकाळी मुंबईतील निवासस्थी त्यांची प्राणज्योत मालवली. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आजाराचा फार मोठा बाऊ न करता ही मानवी जीवनातील शारिरीक आजारासारखीच सामान्य बाब आहे, याबाबत समाजात जागरूकता निर्माण केली होती. तसेच त्यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ त्यांच्या या पुस्तकांना राज्य सरकारचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
भारतीयांना मोठा धक्का; पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ-
डॉ. नाडकर्णी यांनी ठाणे येथे इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (Institute for Psychological Health – IPH) या संस्थेची स्थापना केली होती. तसेच केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न राहता, मानसिक आरोग्याचा विचार समाजात रुजवण्यासाठी त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून मोठे कार्य केले. त्यांची ‘मुक्तीगाथा’, ‘निसर्गवेध’, ‘मनोगत’, ‘आत्मभान’, आणि ‘जिंकू जिद्दने प्रसिद्ध पुस्तके आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील डॉ. आनंद नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहली आहे. त्यांनी एक्सवर लिहिले की, ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्का देणारे आहे. असीम उर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचे धनी असलेले डॉ. नाडकर्णी हे ठाण्याचे लाडके सुपूत्र. गेली साडेतीन दशके मनोविकारशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी निरलसपणे काम केले. ‘सुदृढ मन सर्वांसाठी’ हे ब्रीद घेऊन त्यांनी इन्सिट्यूट फॉर सायकॉलॉजी या संस्थेची स्थापना केली. हजारो अस्थिर मनांना सावरून त्यांच्या कुटुंबियांचे ते खऱ्या मित्र बनले. त्याचवेळी, कै.डॉ.सुनंदा अवचट यांच्या साथीने त्यांनी पुण्यात ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. या दोन्ही संस्थांनी समाजाची केलेली सेवा ही कोणत्याही स्वयंसेवी संस्थेने कशाप्रकारे काम करावे याचेच एक आदर्श प्रमाण आहे.
ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्का देणारे आहे. असीम उर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचे धनी असलेले डॉ. नाडकर्णी हे ठाण्याचे लाडके सुपूत्र. गेली साडेतीन दशके मनोविकारशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी निरलसपणे काम केले. ‘सुदृढ मन सर्वांसाठी’ हे… pic.twitter.com/0aq6QA3b8r
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 15, 2026
मनोविकारशास्त्राच्या क्षेत्रात व्यग्र असताना त्यांच्यात महाविद्यालयीन काळापासून कार्यरत असलेला लेखक, नाटककारही तेवढाच सक्रिय राहिला. ‘गद्दे पंचविशी’, ‘वैद्यक सत्ता’ यासह ‘शहाण्यांचा सायकिएट्रीस्ट’, ‘मनमैत्रीच्या प्रदेशात’ अशी सुमारे २७ प्रकाशित पुस्तके वाचकप्रिय आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहेत. नाट्य क्षेत्रात ‘जन्मरहस्य’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘रंग माझा वेगळा’ ही नाटकेही रसिकप्रिय झाली. डॉ. नाडकर्णी यांच्या निधनामुळे उत्तम मनोविकारतज्ज्ञ, ललित लेखक, कवी, नाटककार, अभिनेता, संगीतकार, तबलावादक, चित्रकार, सामाजिक कार्यकर्ते, तत्वज्ञानाचे कृतीशील अभ्यासक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.