गुडन्यूज! पुढील 12 दिवस धो-धो बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain : राज्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाऊस नसल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत. आता मात्र पावसाबाबत गुडन्यूज मिळाली आहे. राज्यात पुढील 12 दिवस पावसाचे असणार आहेत. हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. कोकणात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे.
विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. खानदेश, मध्य महाराष्ट्रासह दहा जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. राज्यात येत्या 27 जुलैपर्यंत दमदार पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
बंडानंतर पुढे अजितदादांची काय रणनीती? प्रकाश आंबेडकरांनी केलं भाकीत…
हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, पुणे, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना 18 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना 19 आणि 20 जुलै रोजी तर रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना 21 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणेकरांना मिळणार दिलासा
पुणे शहराची पावसाची प्रतिक्षा आता संपणार आहे. पुणे शहराला यलो अलर्ट दिला आहे. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. तसेही मान्सूनच्या आगमनापासून पुण्यातील हवामान ढगाळच राहत आहे. मात्र पाऊस काही केल्या पडत नाही. आता मात्र पावसाची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई पूर्व आणि उपनगरात तर कालपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर या भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.