कौटुंबिक कार्यक्रमाप्रमाणे पवारांचं राजकारणात देखील सोबत नृत्य; राम शिंदे यांनी पवारांना डिवचलं

कौटुंबीक कार्यक्रमात आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सोबत नृत्य. कुटुंबाप्रमाणेच ते राजकारणात देखील ते एकत्र.

  • Written By: Published:
Untitled Design (64)

Ram Shindes Sarcastic Comment On Rohit Pawar Ajit Pawars Dance : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawarआणि आमदार रोहित पवार हे एकत्र नृत्य करताना दिसून येत आहेत. या व्हिडिओवरून आता विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पवारांना टोला लगावला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, हा एक कौटुंबीक कार्यक्रम होता. तिथं आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोबत नृत्य करत होते. कुटुंबात जसे हे एकत्र आहेत तसेच ते राजकारणात देखील ते एकत्र आहेत. ते राजकारणात देखील एकत्र परफॉर्म करत आहेत. त्या एकत्रित नृत्याचा मी २०२४ मध्ये शिकार झालो आहे. त्यामुळे मी या एकत्रित नृत्याचा मी भविष्यात शिकार होणार नाही याची काळजी घेणार आहे. प्राप्त परिस्थितीवर कसा मार्ग काढायचा याच्या प्रयत्नात मी आहे. असं देखील ते यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे यावेळी आरोप केले आहेत. महायुतीत आम्ही निवडणूक लढवली होती मात्र उपमुख्यमंत्र्यांनी माझं काम केलं नसल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी यावेळी केला. कौटुंबिक कार्यक्रमात त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यासोबत नृत्य केलं. तसंच काहीसं नृत्य त्यांनी राजकारणात केलं आणि त्याचा मी २०२४ मध्ये शिकार झालो असल्याचं म्हणत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांना टोला लगावलाय.

Tags

follow us