रिक्षा संघटनेने इशारा देताच प्रशासन एक्शन मोडवर…गॅस दरवाढ करणाऱ्यांवर कारवाईचा दिला इशारा
Gas Price : एलपीजी गॅस दरवाढीविरोधात अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेने काढलेल्या मोर्च्याची प्रशासनाने तातडीने दखल
Gas Price : एलपीजी गॅस दरवाढीविरोधात अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेने काढलेल्या मोर्च्याची प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पुरवठा अधिकारी हेमा बढे यांनी संघटनेचे पदाधिकारी व गॅस कंपन्यांच्या सेल्स मॅनेजर यांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
फेब्रुवारी 2026 पूर्वी 42 रुपये 50 पैसे प्रति लिटर असलेला एलपीजी गॅस दर युद्धानंतर वाढत जाऊन सध्या 100 रुपयांपर्यंत पोहोचल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या दरवाढीमुळे रिक्षा चालकांचे आर्थिक गणित कोलमडले असून व्यवसाय करणे कठीण झाले आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गॅस कंपन्यांकडून मनमानी दरवाढ होत असल्याचा आरोप करत, वाहनांमध्ये गॅस भरताना कमी ऍव्हरेज मिळत असल्याने हेराफेरी होत असल्याचीही तक्रार मांडली. रिक्षा चालक दिवसभर कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, मात्र वाढत्या दरांमुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे.
बैठकीदरम्यान पुरवठा अधिकारी यांनी स्पष्ट निर्देश दिले की, कंपनीकडून ज्या दराने गॅस व पेट्रोल पुरवठा होतो, त्याच दराने ग्राहकांना वितरण करावे. दरफलक (रेट बोर्ड) पंपावर दर्शनीय ठिकाणी लावावा. प्रत्येक ग्राहकाला गॅस भरण्यानंतर बिल देणे अनिवार्य राहील.
अनैतिक संबंध, हातावर ‘टॅटू’ अन् तरुणाची निर्घृण हत्या; धुळ्यात नेमकं काय घडलं?
दरम्यान, संघटनेच्या वतीने शहरातील एचपी व इंडियन ऑइलचे बंद असलेले गॅस पंप तातडीने सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
या बैठकीस शहर पुरवठा तहसीलदार सपना बहुते, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश तात्या घुले, उपाध्यक्ष दत्ताभाऊ वामन, कार्याध्यक्ष विलास कराळे पाटील, सरचिटणीस अशोक औशीकर, लतीफ शेख, गणेश आटोळे, नारीस खान, सुधाकर साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते.गॅस दरवाढीवर प्रशासनाची तातडीची कारवाई.