संभाजी भिडे पुन्हा बरळले; 76 राष्ट्रांनी आक्रमण केलेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान
सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या विधानांमुळे वादाचे प्रसंगही उद्भवल्याचे यापूर्वी घडले आहे. त्यानंतर आता पुन्हा संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नवरात्र उत्सवाबाबत बोलताना भिडे यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. ते सांगलीत एका कार्यक्रमात बोलत होते. (Sambhaji Bhide Controversial Statement On Navratri)
आयटम सॉंगमुळे लहान मुलं मॅच्यूअर होतात का? मानसशास्त्रज्ञांनी शेअर केला अनुभव
काय म्हणाले संभीजी भिडे?
नवरात्र उत्सवाबाबत बोलताना भिडे म्हणाले की, दांडियामुळे नवरात्रोत्सवाचा बट्ट्याबोळ झाला असे म्हणत जगात हिंदू महामूर्ख आहेत असे भिडे म्हणाले आहेत. एवढेच नव्हे तर, 76 राष्ट्रांनी आक्रमण केलेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान असे म्हणत अजूनही ते आपला पाठलाग करीत आहेत. दुर्दैवाने आपण पाय लावून पळत आहोत असे भिडे यांनी म्हटले आहे. राजकारण, सत्ताकारण हे शूद्र असून थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप बनण्याचा मार्ग शिकवला, पण आज गणपती आणि नवरात्र उत्सवात आम्ही समाजाला गोंधळात टाकतोय असे ते म्हणाले.
एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह, २४ तास हेल्पलाईन, महिला सुरक्षेसाठी पंचशक्ती; अजितदादांची माहिती
हिंदी चिनी भाई-भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला होता, असं म्हणत भिडेंनी दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदूना शत्रू कोण, वैरी, वाईट कोण चांगलं कोण हे कळत नाही. महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात असल्याचं विधानही भिडे यांनी केलं. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आपल्याला भारत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही भिडे म्हणाले.
भाजप पहिला धक्कातंत्राचा चॅप्टर उद्या खुला करणार; विधानसभेचे 100 शिलेदार ठरले
दौडीत महिलांना प्रवेश मिळणार नाही
नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही, नवरात्रीचे वाटोळं होऊ द्यायचे नाही, असे संभाजी भिडे यांनी ठणकावले. माताभगिनींनी स्वतंत्र दौड काढावी, मात्र या दौडीत महिलांना प्रवेश मिळणार नाही, असे संभाजी भिडे म्हणाले. 1962 ला चीनने भारतावर आक्रमण केलं आणि त्यावेळी हिंदी चिनी भाई भाई अशा घोषणा देणारा पंतप्रधान देशाला मिळाला यांच्यासारखी दुर्देवी गोष्ट नसल्याचेही भिडे यांनी म्हटले आहे. भिडे यांच्या या विधानानंतर आता काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महतत्वाटे ठरणार आहे.