Sanjay Raut : …तर शिंदेंचे चार मंत्री नक्कीच घरी जातील, राऊतांनी केलं भाकीत

Sanjay Raut : …तर शिंदेंचे चार मंत्री नक्कीच घरी जातील, राऊतांनी केलं भाकीत

Sanjay Raut on Eknath Shinde : आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तास्थापनेला वर्ष पूर्ण महाराष्ट्राच्या फसवणुकीला एक वर्ष झालं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असतो ते म्हणाले की, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याविषयी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटी बाबत विचारले असता ते म्हणाले की, दिल्लीत ते सेलिब्रेशन करायला बसले असतील. आज फसवणुकीची जयंती आहे. पुढल्या वेळेला फसवणुकीची पुण्यतिथी असेल.तर चार मंत्री नक्की जात आहेत. केंद्रातले दोन मंत्री जात आहेत. या राज्याचा विस्तार जर झाला तर चार मंत्री शिंदे गटाचे नक्कीच घरी जातील. असं भाकीत संजय राऊतांनी केलं आहे. (Sanjay Raut Criticize Eknath Shinde Shivsena )

Nitesh Rane : आदित्य ठाकरेंच्या शकुनी मामामुळे राहुल कनाल शिंदे गटात

आम्ही त्या सरकारकडे सरकार म्हणून पाहतच नाही. महाराष्ट्राच्या फसवणुकीला, शिवसेनेच्या पाठीवर खंजीर खुपसण्याला आणि उचापती करून घटनाबाह्य सरकार स्थापन झालेल्या सरकारला एक वर्ष झाली. अशी टीका संजय राऊतांनी केली तसेच त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांवर देखील निशाणा साधला.

Sanjay Raut : पवारांनी गुगली अन् सिक्सही मारला, फडणवीसांचा पक्ष क्लीन बोल्ड झाला; राऊतांचा टोला

पुण्यासारख्या जिल्ह्यातून अनेक मुली गायब झाल्या त्यांची हत्या करण्यात आली. पालिकेची निवडणूक तुम्ही दोन वर्ष घेऊ शकला नाहीत. हजारच्या आसपास मुली ठाणे, पुणे, मुंबई, खानदेश येथून गायब झाल्या, हे लक्षण कसलं आहे? राज्याचे गृहमंत्री इतर सर्व विषयांवर वायफळ चर्चा करतात. पण गृहमंत्री म्हणून त्यांचा कारभार हा अत्यंत अयशस्वी आहे.

तसेच राऊतांनी यावेळी ठाकरे गटाच्या मोर्चाबद्दल सांगितले की, उद्या सायंकाळी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान पर्यंत हा मोर्चा असणार आहे. मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे करतील.प्रचंड संख्येने मुंबईतून लोक सामील होतील. अनेक विषय आदित्य ठाकरे यांनी मांडले, परंतु सरकारला जाग येत नाही. उद्याचा मोर्चा मुंबईकरांची ताकद दाखविणारा असेल. असंही राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube