Nitesh Rane : आदित्य ठाकरेंच्या शकुनी मामामुळे राहुल कनाल शिंदे गटात

Nitesh Rane : आदित्य ठाकरेंच्या शकुनी मामामुळे राहुल कनाल शिंदे गटात

Nitesh Rane On Aaditya Thackeray :  ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल कनाल हे शिवसेनेत अर्थात शिंदे गटात प्रवेश करणार आहे. 1 जुलै रोजी ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा निघणार आहे. ( Rahul Kanal Join Shinde Camp )  त्यादिवशी कनाल हे शिंदे गटात प्रवेश करणार आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरेंच्या आजूबाजुला अनेक शकुनी मामा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  ( Nitesh Rane attack On Aaditya Thackeray )

संजय राऊत हे शकुनी मामा म्हणून उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात भूमिका पार पाडत आहे. तसेच आदित्य ठाकरेंच्या जवळ देखील एक शकुनी मामा आहे. त्याचे नाव म्हणजे वरुन सरदेसाई होय. ज्याच्यामुळे आदित्य ठाकरेंच्या जवळील सर्व लोक त्यांना सोडून चालले आहे, असा घणाघात नितेश राणेंनी केला आहे. तसेच  वरुण सरदेसाईंच्या काड्या लावण्यामुळे आदित्य ठाकरेंच्या आजुबाजूला त्याचे नातेवाईक सोडून कोणीही उरलेले नाही. राहुल कनाल यांचा शिंदे गटात होणारा प्रवेश हा आदित्य ठाकरेंना आरसा दाखविणारा असल्याचे  म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे सख्खे मावस भाऊ आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती! अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर ‘शिंदेशाही’ला झाली होती सुरुवात…

तसेच  मुंबईतील कोविड घोटाळ्यामध्ये सर्वात आघाडीवर वरुन सरदेसाई होते. काही दिवसांमध्ये चौकशीत वरुन सरदेसाईंचे नाव समोर येणार आहे, असा आरोप राणेंनी केला आहे. जर याला लवकर आवरलं नाही तर उद्धव ठाकरेंप्रमाणे आदित्य ठाकरेंची अवस्था होईल. तसचे सरदेसाई हा लवकरच शिंदे गट किंवा भाजपमध्ये येऊ शकतो, असेही राणे म्हणाले.

कोविड सेंटर घोटाळ्यावरुन देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरेंचा ‘कफनचोर’ उल्लेख…

दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राहुल कनाल हे शिर्डी संस्थानचे विश्वस्त होते. गेल्या काही दिवसांपासून कनाल हे नाराज असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी युवासेनेचा व्हॉट्सअप ग्रुप सोडला होता. माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरेंमध्ये काही जण वितुष्ट निर्माण करत असल्याचा आरोप कनाल यांनी केला होता. पण त्यांना मातोश्री अथवा आदित्य ठाकरेंकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube