गृहमंत्र्यांच्या नावानं मोगलाई सुरु; मोहित कंबोज-‘बार’वरुन राऊतांचं फडणवीसांना पत्र

गृहमंत्र्यांच्या नावानं मोगलाई सुरु; मोहित कंबोज-‘बार’वरुन राऊतांचं फडणवीसांना पत्र

Sanjay Raut On Mohit Kamboj : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis)पत्र लिहून मुंबईमधील (Mumbai)रेडीओ बार (Radio Bar) आणि भाजप नेते मोहित कंबोज ( Mohit Kamboj)यांच्याबद्दल पत्राद्वारे तक्रार केली आहे. संजय राऊत यांनी हे पत्र ट्वीट करत याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की, मुंबईत रेस्टॉरंट बार साधारण 1 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी असताना ‘रेडिओ’ बार हा पहाटे 3.30 वाजेपर्यंत चालू होता व आतील धिंगाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्रास होऊ लागला. बाहेर ट्रॅफिक जाम (Traffic jam) झाले म्हणून संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade)सचिन कांबळे (Sachin Kamble)हे आत जाऊन विनंती करू लागले. तेव्हा त्यांच्यावरच जबरदस्ती व धक्काबुकीचा प्रयत्न झाला आहे.

अजितदादांची घरातच कुस्ती चाललीये; नांदगावकरांचा मिश्किल टोला

बारमध्ये मोठ्या प्रमाणात मुली होत्या व त्यांच्या गराड्यात भाजपचे एक तरुण नेते मोहित कंबोज हे मद्यधुंद अवस्थेत होते. सचिन कांबळे यांनी पोलिसांना पाचारण केले, पण मोहित कंबोज हे वर्दीतल्या पोलिसांशी दादागिरीच्या भाषेत अर्वाच्च पध्दतीने बोलू लागले. काही पोलिसांना धमक्या दिल्या. हिमत असेल तर मला येथून बाहेर काढून दाखवा. मी आता देवेंद्रला फोन करतो बघा, असे तो राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावाने धमकावू लागला व पोलीस हतबलतेने हा सर्व तमाशा अपमानित होऊन पाहात राहिले.


पोलिसांसमोर कम्बोज हे त्याही अवस्थेत दारु पित राहिले. याबाबतचे हॉटेल व बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज त्वरित पोलिसांनी जप्त करावेत. कंबोज हे वारंवार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख करीत असल्याने पोलीस दबावाखाली आले. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आहे.

महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या नावाने मोगलाई सुरू असल्याचे दिसून येते. रेडिओ बार हा अंमली पदार्थांचे सेवन, विक्री तसेच पिकअप पॉइंट म्हणून कुप्रसिद्ध आहे. शनिवारी पहाटेपर्यंत येथे बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांचे सेवन, विक्री सुरू होती व भाजपचे एक नेते तेथे मद्यधुंद अवस्थेत उपस्थित होते व गृहमंत्र्यांच्या नावाने पोलिसांना धमकावत होते. ही बाब गंभीर आहे.

खार पश्चिमेचा रेडिओ बार कोणाच्या मालकीचा आहे? त्याचा तपास करून पोलिसांना धमकावणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई व्हावी व नियम मोडणाऱ्या संबंधित रेडिओ बारचा परवाना रद्द करण्याची मागणीही या पत्राद्वारे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मोहित कंबोज रात्री 3 वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. तर दुसरीकडे त्याच दिवशी पुण्यामध्ये संगीतकार एआर रहमान यांचा कार्यक्रम होता. परंतु रात्रीचे 10 वाजल्यानंतर देखील कार्यक्रम सुरू ठेवल्याने पुणे पोलिसांनी रहमान यांना चांगलंच फैलावर घेतले आहे. पुणे पोलिसांनी चक्क स्टेजवर जाऊन कार्यक्रम बंद पाडला. तर दुसरीकडे भाजपचे नेते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत. याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube