Satyajeet Tambe चा फोटो शिंदे गटाच्या बॅनरवर, नव्या चर्चाना उधाण ?

  • Written By: Published:
Satyajeet Tambe चा फोटो शिंदे गटाच्या बॅनरवर, नव्या चर्चाना उधाण ?

काही दिवसापूर्वी झालेल्या पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष म्हणून निवडून आले. पण सत्यजित तांबे यांची उमेदवारी आणि त्यांनतरचा वाद यामुळे सत्यजित तांबे मोठ्या चर्चेत आले होते. निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे यांनी आपण अपक्षच राहणार असल्याचं जाहीर केलं. तरिही काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सत्यजित काँग्रेसमध्ये परत येतील, असा आशावाद व्यक्त केला असला तरी सत्यजित यांनी आपण अपक्षच राहणार असल्याचं सांगितलं.

पण या सगळ्यामध्ये आता नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याच कारण म्हणजे नाशिकमध्ये ठिकठिकाणी लागलेले बॅनर्स. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने शिवजयंती निमित्त शहरात अनेक ठिकाणी बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सवर पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांच्यासोबत आमदार सत्यजित तांबे यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

हेही वाचा : Balasaheb Dabhekar : भाजपने टाकला डाव; काँग्रेसमधील नाराजांच्या भेटीला थेट चंद्रकांत पाटील!

काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याच जाहीर केल्यानंतर शिंदे गटाच्या बॅनरवर फोटो दिसल्याने ही नव्या राजकारणाची नांदी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या अजून फक्त बॅनरवर फोटो असले तरी सत्यजित तांबे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत का? हा प्रश्न देखील अजून अनुत्तरित आहे.

दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर अहवाल देण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये सत्यजित तांबे यांच्या विधानपरिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या वादावर काँग्रेस हायकमांकडून एक सदस्यीय समिती नेमून नाना पटोले आणि थोरात-तांबे वादावर आढावा घेण्यास सांगितले आहे. दिल्लीतून नेमलेल्या या समितीमुळे पुन्हा एकदा राज्यात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube