Balasaheb Dabhekar : भाजपने टाकला डाव; काँग्रेसमधील नाराजांच्या भेटीला थेट चंद्रकांत पाटील!

Balasaheb Dabhekar : भाजपने टाकला डाव; काँग्रेसमधील नाराजांच्या भेटीला थेट चंद्रकांत पाटील!

पुणे : कसबा निवडणुकीसाठीची (Kasba Bypoll) रंगत दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक नेता असो की छोटा कार्यकर्ता यांना आपल्याकडे वळविण्यासाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे. असाच एक प्रसंग आज पुण्यात पहावयास मिळाला. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakde) हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांच्या घरी पोहोचले. त्यामुळे काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे बाळासाहेब दाभेकर हे नाराज होते. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा फायदा करून घेण्यासाठी भाजप नेते त्यांच्याशी चर्चा करायला गेले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि संजय काकडे या दोन नेत्यांना काँग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी थेट कोणतेही आश्वासन दिलेले नाही. मात्र, चंद्रकांत पाटील आणि संजय काकडे यांच्या या भेटीमुळे बाळासाहेब दाभेकर हे पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे पहायला मिळत आहे.

दाभेकर यांनी काँग्रेसकडून बंडखोरी करत अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांच्या फोननंतर बाळासाहेब दाभेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. मात्र, अद्याप बाळासाहेब दाभेकर हे मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात त्यांची अनुपस्थिती असल्याने दाभेकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube