Nashik Graduate Constituency : सत्यजित आला रे सत्यजित आला, नाशिकचा गड तांबेंनी राखला

  • Written By: Published:
Nashik Graduate Constituency : सत्यजित आला रे सत्यजित आला, नाशिकचा गड तांबेंनी राखला

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा 29465 मतांनी पराभव केला आहे.

अंतिम निकाल हाती आला तेव्हा अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे 29465 मतांनी विजय मिळवला. सत्यजित तांबे यांना एकूण 68999 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत.

तर महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पहिल्या पसंतीची 39534 मते मिळालीआहेत. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेवार रतन बनसोडे यांना 2645 मते मिळाली आहेत.

तसेच या मतदारसंघात मते बाद होण्याचे प्रमाण जास्त होते येथे एकूण 12297 मते बाद झाली आहेत. त्यामुळे विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा कमी झाला होता.

एकंदरीत निवडणुकीचा निकाल पाहता अपक्ष उमेदवार तांबे यांचीच नाशिक पदवीधर मतदार संघावर पकड कायम असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या या मतदारसंघात सत्यजित तांबेंच्या विजयानंतर त्यांची पुढील वाटचाल कशी असणार? ते भाजपमध्ये प्रवेश करणार कि काँगेसमध्ये राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अंतिम फेरी अखेर

नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2022 – 23
एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 615

➡️ सत्यजित सुधीर तांबे : 68999
➡️ शुभांगी भास्कर पाटील 39534
➡️ रतन कचरु बनसोडे :2645
➡️ सुरेश भिमराव पवार :920
➡️ अनिल शांताराम तेजा :96
➡️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर :246
➡️ अविनाश महादू माळी :1845
➡️ इरफान मो इसहाक :75
➡️ ईश्वर उखा पाटील :222
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे :710
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख :366
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले :271
➡️ नितीन नारायण सरोदे :267
➡️ पोपट सिताराम बनकर :84
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे :151
➡️ संजय एकनाथ माळी :187
➡️ वैध मते :116618
➡️ अवैध मते :12297
➡️ एकूण :129615
➡️कोटा:58310

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube