नाशिकमध्ये ड्रामा, वडिलांऐवजी सत्यजित तांबेच उमेदवार

नाशिकमध्ये ड्रामा, वडिलांऐवजी सत्यजित तांबेच उमेदवार

नाशिक : सस्पेंस असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून अखेर डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल भरण्यात आला आहे.

डॉ सुधीर तांबे यांनी याबाबत माहिती दिली असून यावेळी तांबे म्हणाले, मागील तीन वेळी मी निवडुन आलो आहे. मी आमदार असताना शिक्षकांचे सोडविण्यासाठी मी प्राधान दिलं. माझ्या माध्यमातून मी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत

नाशिक मतदारसंघासाठी आता नवीन उमेदवार देण्याची गरज असल्याचं मला वाटत असून त्यामुळे आज आम्ही सत्यजित तांबे यांचा अर्ज दाखल केला असल्याचं त्यांनी म्हटलंय. सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्यावतीने अर्ज भरला आहे. यासोबतच सत्यजित तांबे यांनी दोन अर्ज भरले असून अपक्ष अर्ज देखील त्यांनी भरला आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले. चारही जागांसाठी दोन्ही पक्षांकडून उमेदवार देण्यात आले होते मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी दोन्ही पक्षाकडून उमेदवार घोषित करण्यात आले नव्हते.

अखेर आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या मतदारसंघात उमेदवारीवरुन एक प्रकारचा ड्रामा पाहायला मिळाला आहे. या मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे होते.

यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारकडून सुधीर तांबे यांनी उमेदवारी मिळणार हे निश्चित होतं अखेर त्यांना कॉंग्रेसकडून उमेदवारीदेखील जाहीर करण्यात आली होती. राजकीय वर्तुळात सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्जदेखील भरल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचीदेखील चर्चा सुरु होती.

त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे अस्पष्टच होते. अखेर महाविकास आघाडी सरकारकडून सत्यजित तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडी सरकाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीने ठेवलेला सस्पेंस अखेर संपला असून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित तांबे असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र, अद्याप भाजपकडून नेमका कोण उमेदवारी अर्ज भरणार. नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपकडून कोणाला तिकिट मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सर्वपक्षीयांच्या भेटीगाठी घेऊन मदत करण्याची विनंती करणार असल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने सुधीर तांबे ऐवजी सत्यजीत तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय.

भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले खासदार सुजय विखे यांचे निकटवर्तीय ॲड. धनंजय जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अहमदनगरमधून नाशिकमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे भाजपकडून उमेदवारीचा काय निर्णय होतो? याकडे नगरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आत्तापर्यंत सात उमेदवारांनी 10 उमेदवारी अर्ज सादर केले असून 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube