Satyajit Tambe : सत्यजित तांबे यांना कोरा फॉर्म दिला होता… जवळच्या मित्राचा खुलासा

  • Written By: Published:
Untitled Design (1)

कोल्हापूर : सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना पक्षाने डावलले नसून कोणी उमेदवारी घ्यायची याचा निर्णय तांबे कुटुंबियांनी घ्यायचा होता. काँग्रेस तसे अधिकार त्यांना दिले होते असे परखड मत कॉंग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) यांनी व्यक्त केले. ते आज कोल्हापूरात सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासह पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

पत्रकार परिषदेत नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये घडलेल्या राजकिय घडामोडींवर प्रश्न विचारल्यावर बोलताना ते म्हणाले, “कॉंग्रेस (Congress) पक्षाने सत्यजित तांबे यांना कधीच डावलल नाही. पक्षाने तांबे कुटुंबाला कोरा एबी फॉर्म दिला होता. कोणी उमेदवारी घ्यायची याचा निर्णय तांबे कुटुंबियांनी घ्यायचा होता. मग सत्यजित तांबे यांना डावल असे कसे म्हणता येईल.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “वरिष्ठांनी तांबेंच्या बाबती जो निर्णय घेतला आहे तो वरिष्ठांनी घेतला आहे. माध्यमात भाजपप्रवेशाबाबत चाललेल्या चर्चा निरर्थक आहेत. तरीही महाराष्ट्राचे राजकीय संस्कृती आम्ही पहील्यापासून पाहतोय. राजकिय मतभेद असले तरी विरोधी नेता आला तर नमस्कार करायचा नाही का? माझी माध्यमांना विनंती आहे कि, या चर्चांना इथेच पुर्ण विराम द्यावा.” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

Tags

follow us