लव्ह मॅरेज केलं पण रोजच भांडणं; मुख्याध्यापिका पत्नीनेच नवऱ्याचा… धक्कादायक खुनी कांड समोर

लव्ह मॅरेज केलं पण रोजच भांडणं; मुख्याध्यापिका पत्नीनेच नवऱ्याचा… धक्कादायक खुनी कांड समोर

Yavatmal Teacher Crime News : यवतमाळ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुख्याध्यापिकने आपल्याच नवऱ्याला निर्घृणपणे खून केला आहे. (Teacher) विशेष म्हणजे हा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या मुख्याध्यापिकेने आपल्या विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या खुनाचा छडा पोलिसांकडून लावला जात होता.

अंगावर जखमा, वैष्णवी हगवणेंच्या पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर

या प्रकरणात खून झालेल्या व्यक्तीचे नाव शंतनु अरविंद देशमुख असं असून तेदेखील शिक्षक होते. तर निधी शंतनु देशमुख असं मारेकरी मुख्याध्यापिका पत्नीचं नाव आहे. शंतनु आणि त्याची पत्नी निधी हे दोघेजण यवतमाळच्या सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापिका होते. या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचाय, याचाच राग मनात धरून पत्नी निधीने आपला पती शंतनूला संपवून टाकण्याचं ठरवलं. त्यातूनच नंतर शंतूनची हत्या केल्याची कबुली निधीने पोलिसांसमोर दिली आहे.

घटना कशी समोर आली?

काही दिवसांपूर्वी एक निर्घृण खून करण्यात आला होता. मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ ओतून तो जाळून टाकला होता. लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगल शिवारात हा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढलला होता. अवस्थेत आढळून आला होता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्र फिरवित मृताची ओळख पटवली होती.

हा मृतदेह शंतनु यांचा असल्याचं समोर आलं होतं. नंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली होती. यातून मृतक शिक्षकाची मुख्याध्यापिका पत्नीच मारेकरी निघाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या विधी संघर्ष तीन बालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या