मुंबईत ४०-५० मजली इमारतीत मराठी माणूस कुठय?; मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांचा वार

मुंबईत ४०-५० मजली इमारतीत मराठी माणूस कुठय?; मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांचा वार

Sharad Pawar Pune : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई आणि मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या वादात शरद पवारांनीही उडी मारली आहे. (Pune) मुंबईतील ४०-५० मजली इमारतीत मराठी माणूस कुठेच दिसत नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. ते पुण्यात उल्हास पवार यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये ते बोलत होते.

या कार्यक्रमाला शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी गिरणी कामगार आणि चळवळीच्या आठवणीला उजाळा दिला. शरद पवार म्हणाले, ‘आजचा हा कार्यक्रम साखर व्यवसायातील व्यक्तीचा सन्मान आहे. पूर्ण आयुष्य कामगार चळवळीत घालवलं. अनेक प्रश्न चळवळी केल्या. आमच्या पिढीने कुठं ना कुठे हादरा देण्याचं काम केलं.

काही लोकं बेन्टेक्सचं त्यांचं काय करायचं? हे भाजपच्या खऱ्या सोन्याने पहावं; रोहित पवारांचा पडळकरांवर निशाणा

अहिल्यानगर जिल्हा जुन्या काळात गाजलेला जिल्हा होता, साखर चळवळ सुरू झाली. सहकार आणि खाजगी असे अनेक साखर कारखाने होते. कामगार हिताचे प्रश्न आले की नेतृत्व उभं राहिले. त्यात साथी किशोर पवार यांचं नाव पुढं येते, मी नववीला प्रवरानगरातील शाळेत शिकलो. एक वर्ष शिकलो. त्यातील अनेक विद्यार्थी चळवळीत असायचे. त्यातून सत्याग्रह करण्याची सुरुवात झाली.

माझ्या आयुष्यातील सर्वात पाहिला मोर्चा प्रवरानगरमध्ये काढला. कारखाना बंद करायला सांगायला गेलो. महाराष्ट्र सीमा प्रश्नाबाबत एकीकडे समिती स्थापना झाली. किशोर पवार सेक्रेटरी. सत्याग्रह करायचे ठरले. बेळगावमध्ये जाऊन सत्याग्रह करायचे आहे. पण आम्हाला अटक होणार असं माहिती होती, त्यात माझे नाव. बेळगाव जाताना मी गाडी चालवत होतो. तेव्हा पोलिसांना चुकवत सत्याग्रह करण्यासाठी पोहचलो, अशी आठवण त्यांनी सांगितली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube