शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर
मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. विधान परिषदेच्या पाच सदस्यांची मुदत 7 फेब्रुवारीला संपत आहे. यासाठी 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. यातील तीन मतदार संघांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेत.
आज (दि.9) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत तीन मतदार संघातील भाजपच्या उमेदवारी जाहीर केल्या आहेत. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत कोकण जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
कोकण पदवीधर विधान परिषदेसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली. म्हात्रे यांना भाजपच्या एबी फॉर्मवर निवडणूक लढणार आहेत. मराठवाडा पदवीधरसाठी किरण पाटील यांना तर पश्चिम विदर्भासाठी रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर पूर्व विदर्भासाठीच्या जागेचा निर्णय पुढील एक ते दोन दिवसात जाहीर केला जाणार असल्याचे यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या मताधिक्क्यानं जागा जिंकणार असल्याचा विश्वासही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, रविंद्र चव्हान, प्रशांत ठाकूर, कपिल पाटील आदी उपस्थित होते, यावेळी उदय सामंत म्हणाले की, कोकणला एका विशिष्ट पक्षाचा बालेकिल्ला म्हणून सांगितला जातो, पण आम्ही याठिकाणी उपस्थित असल्यानं आता मी तुम्हाला सांगतो की, या ठिकाणी म्हात्रे यांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं आता म्हात्रे यांचा विजय पक्का आहे, याचवेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.