Shiv Sena hearing: निवडणूक आयोगाने आम्हाला न्याय द्यावा, ठाकरे गटाची विनंती

Shiv Sena hearing: निवडणूक आयोगाने आम्हाला न्याय द्यावा, ठाकरे गटाची विनंती

नवी दिल्ली : शिवसेना कोणाची? यावर (Shiv Sena hearing) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गट आणि ठाकरे गटाला आपलं लेखी म्हणणं मांडण्यासाठी आज वेळ दिला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने आज दोन्ही गटांना पाच वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर ठाकरे गटाकडून ईमेलद्वारे लेखी उत्तर सादर करण्यात आलंय. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाविषयी सविस्तर भूमिका मांडण्यात आलीय. केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्याला न्याय द्यावा, अशी विनंती या लेखी उत्तरात करण्यात आलीय.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगात मांडलेले मुद्दे
■ शिवसेनेतील बंडखोरीचा 21 जून 2022 पासून लेखाजोखा ठाकरे गटाने मांडला.
■ शिवसेनेची घटना आधी मान्य होती, आता चाळीस आमदारांना घटना मान्य कशी नाही?
■ एकनाथ शिंदेंचे पद घटनात्मक नाही हेही उत्तरात सादर केले आहे.
■ एकनाथ शिंदेंनी कशाप्रकारे बंड केले हे लेखी दिले आहे. हे इमेलद्वारे उत्तरात सांगण्यात आले आहे.
■ निवडणूक आयोगाने आम्हाला न्याय द्यावा, ठाकरे गटाची विनंती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube