Video : मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; दोन्ही गटात तुफान दगडफेक
Shiv Sena Factions Clash : मुंबईत जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये तणाव वाढला असून, संघर्ष चांगलाच पेटला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी (Shiv Sena) शिंदे गटाच्या उमेदवारावर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे दोन्ही गटांमध्ये वातावरण तापलं, परिणामी मातोश्री क्लबमध्ये दगडफेकीचा प्रकार घडला आहे.
पैसे वाटपाचा आरोप
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबमध्ये शिंदे गटाचे उमेदवार मतदारांना पैसे वाटत होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी क्लबमध्ये जाऊन पैसे वाटप थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार प्रतिक्रिया दिली, परिणामी दोन्ही गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला.
कार्यकर्त्यांवर दगडफेक
शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटप रोखण्यासाठी मातोश्री क्लबमध्ये पोहोचताच शिंदे गटाच्या समर्थकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांना देखील मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. शिवाय, ड्रायडे असतानाही मातोश्री क्लबमधील रेस्टॉरंट अँड बारमध्ये सुमारे ३५० जणांचा जमाव असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे.
Video : दरवेळी मीच पहिला गिऱ्हाईक भेटतो का?; ठाकरेंची पुन्हा झाडाझडती
ठाकरे गटाची दगडफेक
शिंदे गटाकडून दगडफेक झाल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील मातोश्री क्लबवर दगडफेक केली. हा संघर्ष वाढत जाऊन दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करण्याचा प्रकार घडला. यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पोलिसांकडून कारवाई
घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते सध्या पोलिसांच्या रडारवर असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
रात्री मुंबईत जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिंदे गट आणि ठकरे गटात जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दगडफेकही करण्यात आली.#Shivsena #JogeshwariEast #MaharashtraElection2024 pic.twitter.com/D3cRvMWNW5
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) November 13, 2024