Sharad Pawar Retirement : CM शिंदेंआधी पवारांच्या निवृत्तीवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, हा…
Shrikant Shinde On Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. काल मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपण निवृत्त होणार असे जाहीर केले आहे. यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण अध्यक्ष होणार त्यासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत.
यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. शरद पवारांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणाला अध्यक्ष करायचे की स्वत: अध्यक्ष राहायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही यावर जास्त भाष्य करू शकत नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांना आज सकाळी बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. यावर देखील ते बोलले आहेत.
Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप
कोणाला बैठकीला बोलवायचेआहे, कोणाला नही, कोणाला कमी महत्त्व द्यायचं असेल म्हणून बैठकीला बोलावलं नसेल, असा टोला त्यांनी पाटलांना लगावला आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहे.
राष्ट्रवादीत राजीनामा नाट्य तर भाजपकडून ऑफर, बावनकुळे म्हणाले…
तसेच यावेळी श्रीकांत शिंदे त्यांच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघाबाबत देखील भाष्य केले आहे. मा्झा मतदारसंघ हा कल्याण ,डोंबिवली आहे. कल्याण डोंबिवली मध्ये चांगली कामे उभी करण्याची संधी मला लोकांनी दिली आहे. गेल्या ९ वर्षांमध्ये कल्याण डोंबिवली मध्ये मी मोठं काम उभे केले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली शिवाय दुसरा कुठलाही प्रश्न येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.