विंग कमांडर अभिनंदनला पकडणारा पाकिस्तानी अधिकारी ठार, TTP च्या हल्ल्याने पाकिस्तानात खळबळ!

विंग कमांडर अभिनंदनला पकडणारा पाकिस्तानी अधिकारी ठार, TTP च्या हल्ल्याने पाकिस्तानात खळबळ!

Pakistan News : पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण वजीरिस्तानमधील सरगोधा भागात मेजर मोइस अब्बास शाह नावाच्या पाकिस्तानी अधिकाऱ्याचा तहरिक ए तालिबान पाकिस्तान संघटनेने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. मेजर मोइज अब्बास शाहनेच सन 2019 मध्ये बालाकोट एअर स्ट्राइक (Balakot Air Strike) दरम्यान भारतीय वायूसेनेतील अधिकारी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांना पकडले होते.

पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार टीटीपीच्या हल्ल्यात मेजर मोइज अब्बास शाह आणि लांस नायक जिब्रान या दोघांचा मृत्यू झाला आहे. या धुमश्चक्रीत टीटीपीच्या 11 जणांना मारण्यात आल्याचे पाकिस्तान सैन्याने सांगितले. डॉन न्यूजनुसार पाकिस्तानी सैन्याच्या मीडिया विभागाने सांगितले की खैबर पख्तुनख्वातील दक्षिण वजीरिस्तान जिल्ह्यात गुप्त ऑपरेशन दरम्यान दोन सैनिक ठार झाले. इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या माहितीनुसार 24 जून 2025 रोजी सुरक्षा दलांनी दक्षिण वजीरिस्तान जिल्ह्यात सरगोधा भागात एक ऑपरेशन केले. या हल्ल्यात मेजर मोइज अब्बास शाह आणि लांस नायक जिब्रान मारले गेले.

इराणचा अणुकार्यक्रम अजून संपलेला नाही; अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालाने ट्रम्पचं गुपित उघड

मोइज अब्बास शाह नेमका कोण?

फेब्रुवारी 2019 मध्ये मेजर मोइजचं नाव चर्चेत आलं होतं. भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मोइजने पकडल्याचा दावा केला जात होता. यानंतर मोइजने अनेक मुलाखती दिल्या. यात त्याने अभिनंदन वर्धमानशी कोणत्या परिस्थितीत सामना झाला होता याची माहिती दिली होती. पाकिस्तानी मीडिया आउटलेट आणि न्यूज चॅनेल्सने मोइज अब्बासच्या मृत्यूची माहिती दिली आहे. पाकिस्तानी सैन्यानेही मोइजच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. परंतु, अभिनंदन बाबतीत कोणताही उल्लेख करण्यात आला नाही.

पाकिस्तानी सैन्याचं अभियान

अरब न्यूजच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानी सैन्याचा मीडिया विभाग आयएसपीआरने एक निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की अफगाणिस्तानच्या बॉर्डरशी लागून असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दक्षिण वजीरिस्तान जिल्ह्यात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर एक अभियान सुरू करण्यात आले. पाकिस्तानी सैन्याकडून भारतावर आरोप केले जात आहेत. पण सगळ्या जगालाच माहिती आहे की दहशतवादाचा खरा पोशिंदा पाकिस्तानच आहे. तालिबानला पाकिस्ताननेच खतपाणी घातलं होतं. पण आता त्याच तालिबानच्या पाकिस्तानी संघटनेने आज पाकिस्तानला जबर दणका दिला.

मोठी बातमी! इराण अन् इस्रायलमध्ये युद्धबंदी; अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube