Amruta Fadnvis & Riyaaz Ali : अमृता फडणवीस आणि रियाझ अली यांचं सरकारी बंगल्यात शूटिंग : राष्ट्रवादीचा आरोप
मुंबई : सरकारी बंगल्यात रिल्स स्टार रियाझ अलीसोबत(RiyaazAli) अमृता फडणवीसांनी(AmrutaFadnvis) रिल्स बनवल्याने सध्या सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. सरकारी बंगल्यात रिल्स बनवल्याप्रकरणी अमृता फडणवीस पुन्हा एकदा वादात सापडल्याचं दिसून येतंय. हा व्हिडिओ सरकारी बंगल्यात केला असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या हेमा पिंगळे यांनी केलाय.
अमृता फडणवीस यांनी रियाझ अलीसोबत ‘आज मैं मूड बना लीया’ या गाण्यावर रिल्स बनवला होता. त्यांनी हा रिल्स व्हिडिओ सरकारी बंगल्यात बनवलाय. नुसता रिल्स व्हिडिओ बनवला नसून त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रसिध्द केला.
अमृता फडणवीस यांचा व्हिडिओ नेटकऱ्यांनी पाहिल्यानंतर अनेक टीका-टिपण्या केल्याचं दिसून आलंय. सध्या त्यांच्या या रिल्स व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी ट्रोलही केलंय.
मागील महिन्यातच अमृता फडणवीस यांचं पंजाबी गाणं ‘आज मैं मूड बना लीया’ हे गाणं प्रदर्शित झालंय. या गाण्यामध्ये पहिल्यांदाच अमृता फडणवीस यांनी नृत्य केल्याचं दिसलं. अमृता फडणवीस गाणं प्रदर्शित झाल्यानंतर गाण्याला चागंलाच प्रतिसाद मिळाला आहे.
काही नेटकऱ्यांनी तर या गाण्यावर स्वत:चे रिल्सही बनवून व्हायरल केले आहेत. अनेकांनी या गाण्याचा आनंद लुटल्याचं सोशल मीडियावर दिसून आलंय. आता अशातच अमृता फडणवीसांनी रिल्स बनवल्यानंतर नेटकऱ्यांकडून त्यांना ट्रोल करण्यात येतंय.
तर दुसरीकडे सरकारी बंगल्यात अमृता फडणवीसांनी हा व्हिडिओ बनवल्याचा दावा देखील करण्यात आलाय. दरम्यान, ज्या प्रेक्षकांनी गाण्याला उचलून धरलं त्यांच्याकडून ट्रोल करण्यात येत आहे.
त्यासोबतच एका मुस्लिम कलाकारासोबत रिल्स केल्याने अनेक नेटकऱ्यांनी भाजप आणि संघाला या वादात ओढत हिंदुत्ववादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.