सोमय्या म्हणतात, राऊतांचे पार्टनर जेलमध्ये गेले आता उद्धव ठाकरेंच्या पार्टनरची बारी

सोमय्या म्हणतात, राऊतांचे पार्टनर जेलमध्ये गेले आता उद्धव ठाकरेंच्या पार्टनरची बारी

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiyya) पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. संजय राऊत (Sanjay Raut)यांचे पार्टनर सुजीत पाटकर (Sujit Patkar)यांचे पार्टनर राजू चहावाला हे 100 कोटींच्या कोविड घोटाळ्यात जेलमध्ये गेले आहेत. आता नंबर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचा आहे. संजय राऊत यांचे पार्टनर जेलमध्ये गेले, उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वाईकर यांनी आता तयारी करावी.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 20 ऑगस्ट 2021 रोजी आपले पार्टनर रवींद्र वायकर याच्या 500 कोटी रुपयांच्या 2 लाक स्केअर फूट हॉटेलच्या घोटाळ्याला मान्यता दिली. रवीद्र वायकर, उद्धव ठाकरे, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, शरद पवारांचे पारिवारीक मित्र विनोद गोयंका, शहीद बलवा, अविनाश भोसले यांनी 2021 मध्ये महल पिच्चर प्रा. लि., जोगेश्वरी विक्रोली रोडवर कमाल अमरोही स्टुडिओ आणि त्याचे मालक यांची जमीन याचा मोठ्या प्रमाणात घोटाळा केला. पहिला त्यांनी विनोद गोयंका, अविनाश भोसले, बाजवा यांच्या कंपनीला 2000 वर्ष जुनी महाकाली गुंफाचा टीडीआय दिला. पुन्हा याच कंपनीला याचा पाठपुरावा रवींद्र वायकर यांनी पाठपुरावा केला.

Tunisha Sharma Suicide प्रकरणातील आरोपी शीझान खानला 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

23 जुलै 2021 रोजी उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर जे 2 लाख स्केअर फुटाचं क्रीडांगण आरजी प्लॉट होता. जो मुंबईकरांचा होता, त्याची रवींद्र वायकर यांची मालकी दाखवून त्याची दोन लाख स्केअर फुटाच्या फाईव्ह स्टार हॉटेलला परवानगी उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेनी दिली. आता गंमत बघा ही जागा 2005 मध्ये महाल पिच्चरकडून रवींद्र वायकर यांचा ताबा आहे, कायदेशीर गैरकायदेशीर आहे म्हणून त्याच्या नावाने विक्री दाखवली.

2007 ते 2009 दरम्यान हा आरजी प्लॉट ग्रीन रिझोलेशन म्हणून वायकर यांनी अर्ज केला आणि पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या मुंबई महापालिका 30 टक्के जमीनीवर स्पोर्ट सेंटरसाठी परवानगी दिली. त्याच्यानंतर 70 टक्के जागा 2 लाख स्केअर फूटचं मैदान हे महापालिकेच्या ताब्यात आलं. पण ठाकरे यांची कृपा आता वायकर हे पार्टनर आहेतच.

अलिबागचा 19 बंगलाोचा घोटाळा सर्वांना माहितच आहं. साडेनऊ एकरची जागा आणि 19 बंगलो अन्वर नाईककडून रश्मी ठाकरे आमि मनिषा वायकर यांनी विकत घेतले. म्हणून उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube