काहींनी वाईट करण्याचा प्रयत्न केला पण परमेश्वराने जास्त लोकप्रिय केलं; धनंजय मुंडेंनी विरोधकांना फटकारलं
Dhananjay Munde परळी तालुक्यात बोधेगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी बदनामीच्या मुद्द्यावर विरोधकांना फटकारलं

Some tried to do bad things but God made them more popular; Dhananjay Munde rebukes the opponents : सध्या राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्यामध्ये आता माजी मंत्री धनंजय मुंडे देखील कामांला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी परळी तालुक्यात बोधेगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या झालेल्या बदनामीवर विरोधकांवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
आता मला माजी मंत्री म्हणतात. मला लय मोठं वाटतं, मला लय प्रसिद्धी मिळाली. काहीजण एखाद्याचं वाईट करायला बघतात. केला प्रयत्न, एवढे दिवस संकट सहन केलं, पण या वाईट करणाऱ्यांना लक्षात आलं नाही. शेवटी नियतीला काय मान्य असतं? आपले जर साफ मन असेल तर नियतीसुद्धा आपल्या सोबत राहते. जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला. त्याच्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वराने लोकप्रिय केलं. मंत्री नसतांना असे म्हणत धनंजय मुंडे यांनी जनतेचे आभार मानले आहेत. परळी तालुक्यात बोधेगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पुणे जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात स्टेटस्को; धर्मादाय आयुक्तांनी असा निर्णय का घेतला?
ओबीसी महाएल्गारातून मुंडेंचा सवाल
दरम्यान बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर शुक्रवारी ओबीसी महाएल्गार सभा पार पडली. यावेळी मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाजातर्फे ही सभा आयोजित करण्यात आली. या सभेमुळे राज्यातील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) म्हटलंय की, दोन वर्षांपासून मराठा आणि ओबीसीत समाजात अंतर कोणी पाडलं? आज माझी मराठा समाजाला नम्र हात जोडून विनंती आहे, हे अंतर फक्त दोन समाजात अंतर पडलेले नाही. तर तुमच्याशीही तो दगाफटका करत आहे. उदाहरणासह सांगतो, १३ कोटी जनतेसमोर यावं, मराठा समाजाचा खरा फायदा ओबीसीमध्ये नाही, तर ईडब्ल्युएसमध्ये आहे. ओबीसीत (OBC) का यायचं आहे, तर मुठभर लोकांना गावच्या सरपंच पदापासून राज्यातील सरकारपर्यंत पोहोचायचं.