आमदारांच्या आहाराबाबत स्वच्छ्ता राखण्याच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

आमदारांच्या आहाराबाबत स्वच्छ्ता राखण्याच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

नागपूर : विधान भवनमधील भोजन व्यवस्थेबाबत दिरंगाई करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चांगलेच फैलावर घेतले. झालेल्या दिरांगाईबाबत या शासकीय अधिकाऱ्यांना लेखी स्पष्टीकरण देण्याबाबत यावेळी सांगण्यात आले.

आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार अमोल मिटकरी, विधान परिषद सचिव राजेश तारवी, ऋतुराज कुरतडकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार निवासात आमदारांसाठी असलेल्या भोजन कक्षातील जागा आणि गुणवत्तेसह व्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

विधानभवन परिसरात असलेल्या शौचालयाला लागून असलेल्या नळावर फळे धुण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी निदर्शनास आला. आमदारांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था असलेल्या आमदार निवासात ताट, कप-बश्या शौचालयात धुण्याचा व्हिडीओ आमदार अमोल मिटकरी यांनी सादर केला होता. त्यानंतर तो मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube