अजित पवारांना सरकारी विमान देण्यावरुन सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अजित पवारांना सरकारी विमान देण्यावरुन सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. अनिल देशमुखांवर सुडाचं राजकारण झाल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. त्याचबरोबर अनिल देशमुख प्रकरणाचं प्रायश्चित करण्यासाठी अजित पवार यांना सरकारी विमान दिले असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पत्रकारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेबद्दल केलेल्या प्रश्नाबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी, जयंत पाटील, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील चौघेही मुंबईत जाणार आहोत. अनिल देशमुख आज 4 वाजेपर्यंत जेलबाहेर येतील. ते बाहेर येत आहेत ही आमच्यासाठी महत्वाची बाब आहे.

राज्यातील ईडी सरकारने यंत्रणांच्या माध्यमातून त्यांच्यावर खोटे आरोप केले, हे आता सिद्ध झालं आहे. कोर्टाने स्पष्ट सांगीतले की, कुठलेही पुरावे नाहीत. सरकारने त्यांच्या कुटुंबावर 109 वेळा रेड केली मात्र त्यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे सिद्ध झाले आहे.

आम्ही आधीपासून सांगत होतो की त्यांच्यावरती फक्त खोटे आरोप केले. यांचं फक्त सुडाचं राजकरण सुरू आहे, होय अनिल देशमुख निर्दोष आहेत, कालची कोर्टाची ऑर्डर वाचा म्हणजे लक्षात येईल, खोटे आरोप करतच हे ईडी सरकार सत्तेत आले आहे. ईडी सरकारच्या चार मंत्र्यांवर आरोप झाले आहेत. सरकारने आता त्यांचे राजीनामे घ्यावे. ईडी सरकारनं खोट्या केसेस करुन जनतेला फसवून बंद करावं. चारही मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube