‘सुर्या’चा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा, ‘या’ दिवशी होणार रिलीज

  • Written By: Last Updated:
‘सुर्या’चा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा, ‘या’ दिवशी होणार रिलीज

मुंबई : ‘सुर्या’ या मराठी चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. चित्रपटाच्या ट्रेलरची आणि गीतांची झलक यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स, डीके निर्मित ‘सुर्या’ या अक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे.

समाजातील विघातक प्रवृत्ती जेव्हा वरचढ ठरते तेव्हा, त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी एक नायक पुढे यावा लागतो. नैतिकतेचा बुरखा चढवून काही समाजकंटक चुकीच्या गोष्टी घडवून आणत असतात. त्यांच्या या कृत्याविरोधात लढा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुर्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत राहतो. त्याविरोधात लढण्याची धमक ‘सुर्या’ कशाप्रकारे आणतो याची चित्तथरारक कहाणी दाखविणारा

वेगवेळ्या जॉनरची पाच गाणी चित्रपटात आहेत. बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संजय मिश्रा, देव चौहान, मंगेश ठाणगे, प्रशांत हेडव यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. सुखविंदर सिंग, आदर्श शिंदे, नेहा राजपाल, राजा हसन, ममता शर्मा, कविता राम, खुशबू जैन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीव यांचे आहे.

अभिनेता प्रसाद मंगेश याच्यासोबत अभिनेत्री रुचिता जाधव नायिकेच्या रूपात दिसणार आहे. या दोघांसोबत या चित्रपटात हेमंत बिर्जे, उदय टिकेकर, पंकज विष्णु, अरुण नलावडे, गणेश यादव, संजीवनी जाधव, देवशी खांडुरी, हॅरी जोश, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बोऱ्हाडे, प्रदीप पटवर्धन, दिलीप साडविलकर, जसबीर थंडी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube