ऊसाचा तिढा सुटला…’स्वाभिमानी संघटने’च्या आंदोलनाला यश, 8 तास केला होता चक्काजाम

Swabhimani Sanghatna Protest : पुणे-बंगळुरु महामार्गावर 8 तासांपासून सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केलं होता. माजी खासदार राजू शेट्टी(Raju Shetty)</strong> यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. अखेर 8 तासांनंतर आंदोलनाला यश आलं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. आंदोलन मागे घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत.
NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? शरद पवार अन् अजितदादांसाठी आजचा दिवस महत्वाचा
राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या एकजूटीने कारखानदारांची एकजूट फोडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलनाला यश आल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आता सांगलीकडे वळवला आहे. शनिवारी राजाराम बापू कारखान्यावर एकत्र जमायचे असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.
अपात्रतेच्या यादीतून नाव वगळताच कोल्हेंनी घेतली अजितदादांची भेट, पवारांची साथ सोडणार? चर्चांना उधान
कोल्हापूरमधील सर्व कारखानदारांचे परवानगी पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना देण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कारखान्यांचे पत्र आल्यानंतर तसा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल 3100 रुपये द्यावी. तोपर्यंत तोड नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली होती.
IMDb : टॉप 10 भारतीय स्टार्सच्या यादीतही ‘हे’ कलाकार आघाडीवर, SRK पहिला तर आलियाचा…
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याचं पत्र राजू शेट्टी यांना दिलं. त्यानंतर राजू शेट्टी यांनी चक्का जाम आंदोलन मागे घेतलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या मागण्यासाठी तब्बल 8 ते 9 तास पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखला होता.
बैठकांमध्ये चर्चा निष्फळ :
मागील वर्षी ऊसाला 400 रुपये तसेच यंदाच्या वर्षी आधी 3500 रुपये उचल देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती. ही मागणी मान्य करण्यास साखर कारखानदार तयार नव्हते. यामुळे अर्धा महिना संपला तरी कोल्हापुरात कारखाने अद्याप सुरू झाले नव्हते. यामुळे आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण देखील लागलं होतं या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पालकमंत्री, शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्या बद्दल तीन वेळा बैठक पार पडली होती. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, साखर कारखान्यांनी रुपये ५० रुपये प्रतिटन अतिरिक्त शेतकऱ्यांना द्यावेत. या बाबीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित साखर कारखान्यांनी पाठवावा. पुढील दोन महिन्यांमध्ये त्याला मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना दिले आहे.