प्रत्येक घरात पाच बंदुका असाव्यात, टी. राजा सिंह यांच्या वक्तव्याने खळबळ; मदरसे आणि सुरक्षेवर वादग्रस्त भूमिका

राजा सिंह यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, महाराष्ट्रातील मदरशांमध्ये देशविघातक शिक्षण दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • Written By: Published:
Untitled Design 40

T. Raja Singh’s statement creates a stir : तेलंगणातील आक्रमक भूमिकांसाठी ओळखले जाणारे आमदार टी. राजा सिंह यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या विधानांचे समर्थन करत त्यांनी राज्यातील अनधिकृत मदरशांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, थेट बुलडोजर चालवण्याची भूमिका घेतली आहे.

राजा सिंह यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, महाराष्ट्रातील मदरशांमध्ये देशविघातक शिक्षण दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे केवळ मदरसे बंद करून उपयोग नाही, तर ते पूर्णपणे उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे. जर बंद केले, तर पुन्हा सुरू होतील. त्यामुळे अनधिकृत मदरशांवर बुलडोजर चालवणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. त्यांनी दहशतवादाशी संबंधित व्यक्तींचा उल्लेख करत मदरशांवर गंभीर आरोप केले आणि नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची अंमलबजावणी करण्याचे आवहं देखील केले आहे.

एव्हढ्यावरच न थांबता, त्यांनी संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात देखील तीव्र भूमिका घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री औरंगजेबाची कबर हटवण्यास घाबरत आहेत का? असा सवाल करत, त्या ठिकाणी कब्र उखडून टाकून तिथे शौचालय बांधण्याची मागणी त्यांनी केली. ही कबर महाराष्ट्राला नको असल्याचे सांगत, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल भावनिक संदर्भही मांडला आणि आवशयक असल्यास मोठ्या संख्येने समर्थकांसह येण्याची चेतावणी दिली.

दरम्यान, त्यांच्या भाषणातील सर्वात वादग्रस्त भाग म्हणजे शस्त्रास्त्रांबाबत केलेले विधान. राजा सिंह यांनी नागरिकांना घरात शस्त्र ठेवण्याचे आवाहन करत, प्रत्येक घरात पाच-पाच बंदुका असल्या पाहिजेत असे म्हटले. धर्मासाठी लढण्यासाठी लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा आणि संभाव्य हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन देखील केले आहे. या पूर्व वक्तव्यांमुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील हा मुद्दा संवेदनशील ठरत आहे.

follow us