नाशिक TCS प्रकरण – धार्मिक सक्ती, मानसिक छळ आणि ‘पत्नीला पाठवण्याच्या वक्तव्यामुळे देशभरात खळबळ

नाशिकच्या TCS प्रकरणात एका माजी कर्मचाऱ्याने केलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 99

TCS Nashik forced conversion controversy : नाशिकमधील TCS मध्ये सुरू असलेल्या कथित जबरदस्तीने धर्मांतर वादाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला काही स्तरांवर कॉर्पोरेट जिहाद असं देखील म्हटलं जात आहे. एका माजी कर्मचाऱ्याने केलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे. सदर कर्मचाऱ्याने मुख्य आरोपी तौसिफ़ अख्तर आणि दानिश शेख यांच्या टीममध्ये काम केल्याचा दावा करत सांगितले की, टीममधील महिला कर्मचाऱ्यांवर रमजानच्या काळात रोजा ठेवण्याचा दबाव टाकण्यात येत होता. त्यांना डोक्यावर स्कार्फ घालण्यास भाग पडले जात होते, तसेच काही महिलांवर लैंगिक शोषण झाल्याचे देखील आरोप आहेत. पुरुष कर्मचाऱ्यांना देखील नमाज अदा करण्यास, कलमा पठण करण्यास आणि टोप्या घालण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याशिवाय, वरिष्ठ व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून खिल्ली उडवली जात असल्याचे देखील या कर्मचाऱ्याने सांगितलं. स्वतःचा अनुभव सांगताना त्याने आरोप केला की, तो आणि त्याची पत्नी वैद्यकीय उपचारानंतर देखील अपत्यप्राप्तीसाठी झगडत असताना, वरिष्ठांकडून त्याला पत्नीला त्यांच्याकडे पाठवण्यास सांगितले गेले, जे अत्यंत अमानुष आणि धक्कादायक होते. आदेश पाळले नाहीत तर जास्त काम देऊन मानसिक छळ केला जात असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

प्रशासनात मोठे फेरबदल सुरूच; पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

दरम्यान, एका महिला कर्मचाऱ्याने पुढे येत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले. तिच्या तक्रारीनुसार, एका सहकाऱ्याने तिच्याशी संबंध प्रस्थापित करून लग्नाचे आश्वासन दिले. मात्र तपास सुरू झाल्यानंतर आणखी सात महिलांनी देखील पुढे येत अशाच प्रकारचे अनुभव मांडले. या तक्रारींमध्ये लैंगिक छळ, अयोग्य स्पर्श, अश्लील टिप्पणी, पाठलाग आणि मानसिक दबाव यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काही महिलांनी धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा देखील आरोप केला आहे.

या प्रकरणात आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेनन आणि तौसिफ़ अत्तर यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 40 हुन अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून, पीडित आणि आरोपींचा जबाब नोंदवला जात आहे. एका आरोपीला पकडण्यासाठी महिला पोलिसांच्या मदतीने अंडरकव्हर ऑपरेशन देखील राबवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, हे प्रकार 2022 ते 2026 या कालावधीत घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणात एचआर मॅनेजर निदा खान ही मुख्य सूत्रधार असून तिने तक्रारी दडपण्याचा आणि आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, सर्व पैलूंवर बारकाईने चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.

follow us