‘त्या’ रात्री पोलिस अधिकाऱ्याने माझ्यासोबत.., पीडित महिलेनं सांगितला घटनाक्रम
हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या पती-पत्नीला लिफ्ट मागून गाडीत बसल्यानंतर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एसीपी विशाल ढुमे यांच्यावर गुन्हा दाखल
औरंगाबाद : रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेलेल्या पती-पत्नीला कारमध्ये लिफ्ट मागवून महिलेचा विनयभंग करणाऱ्या औरंगाबाद गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर औरंगाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 14 जानेवारीला रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेच्या रात्री त्यावेळी नेमकं काय घडलं होतं. याबाबत पीडित महिलेने पोलिस ठाण्यात जबाब दिला आहे. गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
रेस्टॉरंटमधून जेवण केल्यानंतर मी आणि माझे पती आणि मुलगी आम्ही रेस्टारंमधून जात असताना पतीचे मित्र एसीपी विशाल ढुमे भेटले. त्यांनी मला गाडीत घरी सोडण्यासाठी हट्ट केला. त्यानंतर आम्ही त्यांना गाडीत बसवले. गाडीत असताना त्यांनी माझ्यासोबत अश्लील चाळे करण्याच प्रयत्न केला. फक्त एवढ्यावरच ते थांबले नसून घरी गेल्यानंतर त्यांनी घरासमोरच मला माझ्या पतीच्या वॉशरुममध्ये जायचं असल्याचा हट्ट केला त्यावरुन त्यांनी वादही केला. अखेर पुढे काय घडलं याबाबत पीडीत महिलेने आज पोलिस ठाण्यात जबाब देऊन आपली कैफियत मांडलीय.
‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?
पीडीत महिला औरंगाबादमध्ये एक अभ्यासिका चालवत असून घटनेच्या रात्री पीडीत महिला आपल्या मुलगी आणि पतीसह एका रेस्टॉरंमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर पीडित महिलेच्या पतीचा मित्र आणि औरंगाबाद गुन्हे अन्वेशण शाखेचे सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे रेस्टॉरंटमध्ये आले.
आमचं जेवण झाल्यानंतर पती आणि मी घरी जाण्यासाठी निघालो तेव्हा ढुमे यांनी घरी सोडण्यासाठी पतीला विनंती केली. पतीने होकार त्यांना गाडीच्या मागच्या सिटवर बसवले. गाडी माझे पती चालवत होते. आणि त्यांच्या बाजूच्या सिटवर मी आणि मुलगी बसले होते. त्यावेळी गाडी सुरु असताना ढुमे यांनी माझ्यासोबत अश्लील हरकती केल्याचं पीडित महिलेनं सांगितलं. अखेर घरी आल्यानंतर मी आणि मुलगी आमच्या घरात गेलो असता घरातील वॉशरुममध्ये येण्यासाठी माझ्या पतीकडे ढुमे यांनी हट्ट केला. वॉशरुम वापरण्यासाठी पतीने नकार दिला मात्र, त्यांनी हट्ट सोडला नाही.
अखेर मी हे सर्व चित्र घराच्या गॅलरीमधून पाहत असताना माझ्या सासूबाईंना खाली जाऊन पाहण्यास सांगितलं. अखेर सासूबाईंनी मध्यस्थी करीत त्यांनी माझं वॉशरुम वापरण्यास ढुमे यांना सांगितलं. मला पीडित महिलेच्या पतीचेच वॉशरुम वापरायचं असल्याचं ढुमे यांनी त्यांना सांगितलं. त्यांच्या या हट्टाला सासूबाई आणि पतींने विरोध केल्यानं त्यांनी घरासमोरचं त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांना बोलवल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने ढुमे यांनी तिथून नेण्यात आल्याचं पीडित महिलेनं आपल्या जबाबात म्हंटले.
मी पोलीस आयुक्तांच्या जवळचा असून ढुमेंनी पीडीत महिलेच्या पतीला शिवीगाळ केली. पीडीत महिलेच्या घरी त्या दिवशी घडलेलेली संपूर्ण घटना घरातील कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर खाली पोलिसांच्या वाहनातदेखील ढुमे गोंधळ घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता.
दरम्यान, या अधिकाऱ्याविरोधात नागरिक आक्रमक झाले असून, त्याला सेवेतून निलंबित करण्याची खासदार इम्तियाज जलील यांनी मागणी केली असून अशा अत्याचारासह विनयभंगांच्या घटनांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्हे कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. अत्याचार झाल्यानंतर पोलिसांकडून न्याय मिळेल ही अपेक्षा पीडितांकडून ठेवण्यात येते. मात्र, नागरिकांचे रक्षकच भक्षक निघाल्याने सर्वसामान्य नागरिकांना कोण न्याय मिळवून देणार? हा आता प्रश्न सर्वासामान्य नागरिकांसमोर उभा आहे.