MPSC Recruitment 2023 : एमपीएससीची इतिहासातील सर्वात माेठी भरती… इतकी पदे भरणार

  • Written By: Published:
MPSC Recruitment 2023 : एमपीएससीची इतिहासातील सर्वात माेठी भरती… इतकी पदे भरणार

पुणे : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने (MPSC) स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी माेठी भरती जाहीर केली आहे. एमपीएससीची इतिहासातील ही सर्वात माेठी (8,169 पदे) भरती असणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राज्य कर निरीक्षक (STI), पोलीस उप निरीक्षक (PSI), दुय्यम निबंधक (Sub Registrar), तांत्रिक सहायक (Technical Assistant) , कर सहायक (Tax Assistant) आणि लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) अशा विविध संवर्गातील तब्बल 8,169 पदे भरणार असल्याचे महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने (MPSC) आपल्या संकेतस्थळावर शुक्रवारी जाहीर केले.

महाराष्ट्र अराजपत्रित 8,169 या पदांसाठी गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा राज्यातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर येत्या 30 एप्रिल 2023 राेजी घेण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी 25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या (MPSC) संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आँनलाइन करता येणार आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागातील रखडलेली पदभरती लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी, यासाठी विद्यार्थ्यांकडून सातत्याने मागणी हाेत हाेती. आखेर महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने ही पदभरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे निलेश गायकवाड यांनी सांगितले की, आमच्या मागणीला आखेर यश आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखाे विद्यार्थ्यांना याचा फायदा हाेणार आहे. मात्र, संयुक्त गट-ब संवर्गासाठी मुख्य परीक्षा ही संगणक प्रणालीवर घेतली जाणार असल्यामुळे भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. तसेच गट-क संवर्गासाठी वेगवेगळे मापदंड लावणार असल्यामुळे इतर मुलांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सर्व परीक्षांचे एकच मेरिट लावण्याची मागणी आम्ही आयाेगाकडे करणार आहे.
————
काेट
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाने लिपिक पदे जी आजपर्यंत फक्त वशिल्याने भरली जायची ती आता आयोगामार्फत भरली जात आहे. आता नक्कीच प्रामाणिक आणि होतकरू मुलेच नोकरीस लागतील. हे समितीचे यश आहे. आयोगाच्या इतिहासात आजपर्यंतची सर्वात मोठी जाहिरात आहे. लिपिक-टंकलेखक पदांच्या प्राधिकरण निवडीबाबत जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो लवकरच दूर करण्यासाठी प्रयत्न करणर आहे.
– महेश घरबुडे, समन्वयक, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
————
महाराष्ट्र लाेकसेवा आयाेग भरणार 8169 पदे
1) सहायक कक्ष अधिकारी (Assistant Block Officer) – 78
2) राज्य कर निरीक्षक (STI) – 159
3) पाेलीस उप निरीक्षक (PSI) – 374
4) दुय्यम निबंधक (Sub Registrar) – 49
5) दुय्यम निरीक्षक (Excise Sub Inspector) – 06
6) तांत्रिक सहायक (Technical Assistant) – 01
7) कर सहायक (Tax Assistant) – 468
8) लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) – 7034

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube