‘अहमदनगर आता अहिल्यादेवी होळकर नगर’, असा आहे नावाचा इतिहास

‘अहमदनगर आता अहिल्यादेवी होळकर नगर’, असा आहे नावाचा इतिहास

लेट्सअप विशेष- प्रशांत शिंदे

Ahmednagar Name Change : औरंगाबाद, उस्मानाबाद नंतर आता अहमदनगर शहराचं नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चौंडी (Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti) येथे केली आहे. अहमदनगर शहराला सांस्कृतीक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. नुकताच नगरचा ५३३ वा स्थापना दिवस झाला आहे. निजामशाहीचा संस्थापक अहमदनिजामशहा याने २८ मे १४९० मध्ये सीना नदीकाठी अहमदनगर शहराची स्थापना केली होती. अहमदनगर शहराच्या नामांतराच्या निमित्ताने इतिहासाचा आढावा.

निजामशाहीच्या काळात अहमदनगर दक्षिण भारताचं मुख्य प्रवेशद्वार मानले जायचं. तेव्हा आजचा दोन तृतियांश महाराष्ट्र निजामशाहीच्या ताब्यात होता. अहमदनगर म्हणजे तेव्हा महाराष्ट्राची राजधानीच म्हणता येईल. अहमदनगर भरभराटीला आलं तेव्हा पुणे, मुंबई, औरंगाबाद या शहरांची नावंही महाराष्ट्राच्या नकाशावर नव्हती. शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक, उद्योग-व्यवसाय अशा अनेक बाबतीत अहमदनगर पुढारलेले होते.

Ahmednagar Name Change : आता अहिल्यादेवी होळकर नगर! CM शिंदेंची थेट घोषणा

येथील स्थापत्य कला आणि जलव्यवस्थापनही विशेष प्रसिद्ध होतं. जगातील मोजक्या देशांत असलेल्या “कनात’ किंवा “करेझ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाणी वाहून नेणाऱ्या भूमिगत पाणी योजना तेव्हा अहमदनगर परिसरात अस्तित्वात होत्या. खापरी नळ योजना, जलमहाल आणि कारंजी हे एकेकाळी या शहराचं वैभव होतं. काळाच्या ओघात हे जलवैभव लोप पावले असले तरी त्याच्या खाणाखुणा अजून कुठेतरी दिसतात, अजूनही कुठेतरी फुटलेल्या खापरी नळातून पाण्याचा झरा वहात असतो.

युद्धात विजयी झालेल्या ठिकाणी राजवाडा बांधून कोटबाग निजाम हे नाव दिलं. अहमदशहाचा मृत्यू १५०८ मध्ये झाला. त्यांची सीना नदीकाठी कबर बांधली गेले होती. त्यास बागरोजा म्हणतात. निजामशाहीचा व्यापार त्याकाळी इराण आणि अरबस्थान देशांशी चालत होता. या शहराला सात वेस होत्या. त्यापैकी माळीवाडा व दिल्ली दरवाजा वेस आजही इतिहासाच्या साक्ष देत उभा आहेत. मुघल सम्राट औरंगजेब यांचा मृत्यू भिंगार येथे झाला आहे. त्यांची कबर दौलताबाद येथे आहे. शहराच्या पूर्वेला दहा किलोमीटरवर नगर-पाथर्डी रस्त्यावर ९०० फूट उंचीच्या शाह डोंगरावर अष्टकोनी चांदबिबी महाल आहे. या वास्तूला चांदबिबीचा महाल म्हणत असले, तरी ती दुसऱ्या सलाबतखानाची कबर आहे.

Ahmednagar name change : फडणवीसांचा होकार; अहिल्यानगरचा मुहूर्त ठरला…

अहमदनिजामशहाने राजधानी वसवण्याचा निर्णय घेतल्यावर मोठ्या कल्पकतेनं पाणी योजना तयार केली होती. नगर शहराच्या पूर्वेला आणि उत्तरेला गर्भगिरीच्या डोंगररांगा आहेत. जमिनीचा उतार आणि गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करून पाणी योजनांचा आराखडा तयार करण्यात आला. सभोवताली डोंगर आणि मधल्या बशीसारख्या भागात नगर शहर. डोंगरावर पडणाऱ्या पावसाचा थेंब अन् थेंब अडवून त्याचे झिरपे एकत्र करून हे पाणी तलावात साठवलं जाई. जगात ही पद्धत “कनात’ किंवा “करेझ’ या नावाने ओळखली जाते.

तलावांच्या खालच्या बाजूस विहिरी खोदण्यात आल्या. या विहिरींतील पाणी बैल आणि हत्तीच्या मोटा लावून उपसलं जाई. नंतर ते खापरी नळांतून (खापरी नळ म्हणजे भाजलेल्या मातीच्या नळ्या जोडून तयार केलेली जलवाहिनी) नगरमधील वेगवेगळ्या मोहल्ल्यांना, महालांना आणि मशिदींना पुरवलं जाई. चौकाचौकांत पाणवठे होते. या हौदांना ‘कारंजी’ म्हणत. मोठ्या वाड्यांमध्ये नळाचं पाणी येई, तर सर्वसामान्य या सार्वजनिक कारंजावर पाणी भरत. माळीवाडा, हातमपुरा, ख्रिस्तगल्ली आदी भागात अशी कारंजी अजूनही अस्तित्वात आहेत. चौपाटी कारंजा, लक्ष्मी कारंजा, आनंदीबाई कारंजा, बारातोटी कारंजा ही केवळ नावच उरली आहेत.

सरकारी अधिकारीही ED च्या रडारवर! तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस

१९ व्या शतकाच्या प्रारंभी देशात स्वातंत्र्य चळवळीचे वारे जोरात सुरू झाले होते. त्याचे नेतृत्व लोकमान्य टिळक यांच्याकडे होतं. केसरी वर्तमानपत्राच्या अग्रलेखातून नगरमध्ये क्रांतीची बीज रोवली. १९१४ साली टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यानंतर १९१६ मध्ये अहमदनगर येथे सभा जाहीर झाली. त्याच सभेत टिळकांनी “स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” ही सिंह गर्जना केली. आणि ती सर्व देशभर पसरली. १९२१ साली महात्मा गांधी यांचे पालिकेच्या पटांगणात व्याख्यान झाले. पुढे त्या मैदानाचे गांधी मैदान नाव प्रचलित झाले. निजामशाहीतील सरदार सर्जेखान यांच्या नवावरून सर्जेपुरा नाव पडले. राजमाता जिजाबाई यांचे वडील लखुजी जाधव यांचा अहमदनगरला तोफखाना होता, त्यावरुन या परिसरास तोफखाना नाव पडले. १९१३ साली एन.एम. वाडिया यांनी पाच हजार रुपये देणगी दिली. त्या दिलेल्या पैशातून वाडियापार्क मैदान उभारले.

पडळकरांनी मागणी केली अन् शासन निर्णयच धडकला; बारामती मेडिकल कॉलेजचे नाव…

अँनी बेझंट यांनी सुरू केलेल्या होमरूल लीगच्या शाखा नगर शहरात स्थापन झाल्या होत्या. त्या चळवळीत अग्रस्थानी ॲड. हरिभाऊ पटवर्धन होते. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचे चिरंजीव रावसाहेब व अच्युतराव पटवर्धन गांधीजी बरोबर होते. १९४२ मध्ये ज्ञानोदय हे पहिले वर्तमानपत्र ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केले. त्याचे पाहिले संपादक रेव्ह. नारायण वामन टिळक होते. १९२४ मध्ये मुद्रा मंदिर छापखाना नगरला सुरू झाला. न्यायसिंधु हे पत्र १८६६ मध्ये कुकडे यांनी सुरू केले. १९४२ ते १९४५ सालात नगरच्या भुईकोट किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभाई पटेल, मौलाना आजाद, नरेंद्र देव, गोविंद वल्लभपंत, पट्टाभी सीतारामय्या इ. बंदिवासात होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांनी नगरमध्ये मुलींच्या शिक्षणाचा प्रसार केला व प्रेरणा दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube