सरकारी अधिकारीही ED च्या रडारवर! तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस

सरकारी अधिकारीही ED च्या रडारवर! तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस

ED notice to State Agriculture Commissioner Sunil Chavan : गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक राजकीय नेते, कंत्राटदार यांच्यावर ईडी, आयकर विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी (central investigative agencies) छापेमारी करून करून मोठ्या कारवाया केल्या. दरम्यान, आता सरकारी अधिकारी या तपास यंत्रणांच्या रडावर आले. अनेक राजकीय नेत्यावर ईडीकडून कारवाई केली जात असतांना आता छत्रपती संभाजीनगर येथील प्रधानमंत्री आवास योजना घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण ((Sunil Chavan) यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.

या घरकुल योजनेत एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता. त्यानंतर ईडीने संभाजीनगरमधील तेरा ठिकाणी छापे टाकले. यानंतर इडीन महापालिकेच्या अधिकाऱ्यामसह तत्कालीन महापालिका आयुक्तांचीही चौकशी केली होती. त्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. सुनील चव्हाण हे सध्या राज्याचे कृषी आयुक्त आहेत.

सरकारी अधिकारीही ED च्या रडारवर! तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेंतर्गत सुमारे 39 हजार घरांचा ‘डीपीआर’ तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. फेब्रुवारी 2022 मध्ये निविदा काढल्यानंतर अनेक कंपन्यांनी यात सहभाग घतेला होता. दरम्यान, काही सहभागी कंपन्यांनी अटी-शर्थींचे पालन न करता फसवणूक केल्याचं समोर आलं होतं. समर्थ मल्टीबिझ इंडिया प्रा. लि., IndGlobal Infrastructure Services आणि Jaguar Global Services या कंपन्यांनी एकाच IP पत्त्यावरून निविदा भरल्या होत्या. यातून ते कोट्यवधींचा घोटाळा करण्याच्या तयारीत होते, असं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिस ठाण्यात 19 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान, या प्रक्रियेत कागदपत्रे सादर करताना पुण्यातील न्याती कंपनीचे नाव जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीशी जोडले गेले. त्यामुळे मूळ न्याती कंपनीचे संचालक नितीन द्वारकादास न्याती, पियुष नितीन न्याती, प्रवीण नितीन न्याती यांना अनुक्रमे 16, 17 आणि 18 क्रमांकाचे आरोपी करण्यात आले होते. आता याच प्रकरणातील काही कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली होती. त्यानंतर ईडीने शहरातील 9 ठिकाणी छापेमारी केली होती. अनेक अधिकाऱ्यांची चौकशी झाल्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनाही ईडीने नोटीस बजावली. त्यामुळं घरकुल योजनेशी संबंधित अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube