Eid Milad : ईद मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल; 17 तारखेला अनंत चतुर्थी असल्याने निर्णय

  • Written By: Published:
Eid Milad : ईद मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल; 17 तारखेला अनंत चतुर्थी असल्याने निर्णय

Eid Milad Un Nabi 2024 : सोमवारी ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याऐवजी आता बुधवारी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे. ईद मिलाद (Eid Milad ) हा मुस्लीम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

डायमंड लीग फायनल खेळणारा पहिला भारती ट्रॅक खेळाडू; अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी

मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी हिंदूंचा सण असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीत मध्ये बदल करण्यात आलेला आहे. याविषयी शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. दरम्यान, इस्लाममध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस ईद मिलाद उन – नब म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने घरे आणि धार्मिक ठिकाणे आकर्षक रोषणाईने सजवली जातात व मिरवणुका काढल्या जातात.

मोठी बातमी! काश्मीरच्या किश्तवाडमधील चकमकीत दोन जवान शहीद; दोन जखमी

याचिका नाकारली

ईद मिलाद उन – नबी निमित्त राज्यात अनेक ठिकाणी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत डीजे आणि प्रखर दिव्यांच्या (लेझर बीम) वापरावर बंदीची मागणी करणारी जनहित याचिका तातडीने ऐकण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. पुढील आठवड्यात सोमवारी ईद – ए – मिलाद साजरा होणार आहे. त्यामुळे, या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube