Union Budget 2023 : हा तर चुनावी जुमला.., अजित पवारांचे टीकास्र्
मुंबई : हा तर चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Shinde) यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला असून अर्थसंकल्पावर अजित पवारांनी (Ajit Pawar) टीकास्त्र सोडले आहे.
अजित पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा वेल्फेअर स्टेटची संकल्पना मोडीत काढणारा आहे. केंद्र सरकारकडून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प सादर केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.
तसेच जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सारखाचं अर्थसंकल्प हवा आहे. मात्र, केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात काही राज्यांना अधिकचं दिलं आहे. आज कर्नाटकची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती महाराष्ट्राची असून कर्नाटकला थोडं अधिक देण्यात आलंय. हा महाराष्ट्रावर केलेला अन्याय असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.
ज्या राज्यामध्ये कमी आहे, त्या राज्यांत अधिकचं दिलं ते ठीक आहे, पण कर्नाटक राज्याला थोडं अधिकचं दिलं आहे. आणि महाराष्ट्रावर केंद्र सरकाकडून अन्याय करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.
आम्ही फार बारकाईने अर्थसंकल्प पाहत होतो, या अर्थसंकल्पात अमृत काळातील मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सातत्याने ज्या आधीच्या अर्थसंकल्पात घोषणा केल्या होत्या, त्याच घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने वर्तमानात कुठंतरी आपल्याला झुकतं माप द्यायला पाहिजे होतं, हा महाराष्ट्रावर अन्याय असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बजेटचं कौतुक केलं जात असून दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली जात आहे.